'बिग बॉस'ची ट्रॉफी मीच घेऊन जाणार! सूरजचा गुलीगत इशारा, म्हणतो- "या सगळ्यांना आता दाखवतो..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:13 AM2024-08-13T11:13:50+5:302024-08-13T11:14:34+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : सूरजचा बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो बिग बॉसच्या ट्रॉफीबद्दल बोलताना दिसत आहे.

bigg boss marathi 5 suraj chavan said i will life trophy of this season | 'बिग बॉस'ची ट्रॉफी मीच घेऊन जाणार! सूरजचा गुलीगत इशारा, म्हणतो- "या सगळ्यांना आता दाखवतो..."

'बिग बॉस'ची ट्रॉफी मीच घेऊन जाणार! सूरजचा गुलीगत इशारा, म्हणतो- "या सगळ्यांना आता दाखवतो..."

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने खास आहे. यंदाच्या सीझनमध्ये कित्येक नवे चेहरे चाहत्यांना पाहायला मिळाले. रीलस्टार सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. सूरज त्याच्या हटके स्टाइलने बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. त्याची झापुक झुपूक स्टाइल चाहत्यांनाही आवडत आहे. या झापुक झुपूक स्टाइलनेच सूरज बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जाणार असल्याचं म्हणत आहे. 

सूरजचा बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो बिग बॉसच्या ट्रॉफीबद्दल बोलताना दिसत आहे. "शेवटी बिग बॉसची ट्रॉफी मीच नेणार", असं सूरज अभिजीतला म्हणत आहे. त्यावर अभिजीत त्याला म्हणतो- "तूच घेऊन जा...तुझा हक्क आहे". त्यानंतर सूरज म्हणतो की "खरंच घेऊन जाणारे...यांना कोणालाच हात लावून देणार नाही..". सूरजला अभिजीत म्हणतो, "शेवटून पहिला आहेस तू...". त्यानंतर सूरज त्याला म्हणतो- "शेवट आलो होतो शेवटच जाणार. ते पण ट्रॉफी हातात घेऊन...पहिलं खंडोबाला माझ्या पप्पांकडे जाणार. मग आई मरीमाताकडे जाणार...इच्छा पूर्ण होऊ द्या पप्पा...ओम नम: शिवाय". त्यावर अभिजीत त्याला म्हणतो की होऊ दे तुझी इच्छा पूर्ण मग आम्हाला पण आनंद होईल. 


दरम्यान, सध्या घरात दोन चिमुकले पाहुणे आले आहेत. या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी घरातील सदस्यांवर आहे. या टास्कमध्ये आता कोणती टीम जिंकणार हे पाहावं लागणार आहे. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण
 

Web Title: bigg boss marathi 5 suraj chavan said i will life trophy of this season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.