Bigg Boss Marathi : कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? Ticket To Finale साठी सदस्यांमध्ये रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 05:17 PM2024-09-30T17:17:48+5:302024-09-30T17:18:37+5:30

'बिग बॉस'च्या फायनलचं तिकीट मिळवताना सदस्यांमध्ये दमछाक, Ticket To Finale टास्क प्रोमो समोर

bigg boss marathi 5 ticket to finale task who will win abhijeet sawant varsha usgaonkar suraj chavan promo | Bigg Boss Marathi : कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? Ticket To Finale साठी सदस्यांमध्ये रस्सीखेच

Bigg Boss Marathi : कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? Ticket To Finale साठी सदस्यांमध्ये रस्सीखेच

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. त्यानंतर आता घरात ७ सदस्य राहिले आहेत. बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अशातच आता बिग बॉस मराठीच्या घरात तिकीट टू फिनालेचा टास्क रंगणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 

यामध्ये सदस्यांना बिग बॉस मराठीच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी एक टास्क देण्यात आला आहे. यामध्ये बाबा गाडीवरुन सदस्यांना घरभर फिरून झेंडे गोळा करायचे आहेत. कमी वेळेत जास्तीत जास्त झेंडे गोळा करणाऱ्या सदस्याला तिकीट टू फिनालेचा टास्क खेळता येणार आहे. यासाठी बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य जीवतोड प्रयत्न करताना दिसत आहेत. बाबा गाडीवरुन झेंडे गोळा करताना सदस्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता कोण बाजी मारून बिग बॉस मराठीच्या फायनलचं तिकीट मिळवतं, हे पाहणं ओत्सुक्याचं असणार आहे. 


दरम्यान, या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. आता घरात राहिलेल्या वर्षाताई, अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, निक्की, धनंजय या सदस्यांपैकी कोण 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी नावावर करणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 
 

Web Title: bigg boss marathi 5 ticket to finale task who will win abhijeet sawant varsha usgaonkar suraj chavan promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.