अभिजीत सावंतला vote करा! सिंगरसाठी धावून आली अभिनेत्री, म्हणते- "कारण नसताना वैभवने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:01 PM2024-08-23T12:01:27+5:302024-08-23T12:02:31+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : यंदाच्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, आर्या जाधव आणि इरिना रुडाकोवा थेट नॉमिनेट झाले आहेत. आता अभिजीतला व्होट करण्यासाठी मराठी अभिनेत्रीने आवाहन केलं आहे.

bigg boss marathi 5 tv actress sonali patil request fans to vote for abhijeet sawant | अभिजीत सावंतला vote करा! सिंगरसाठी धावून आली अभिनेत्री, म्हणते- "कारण नसताना वैभवने..."

अभिजीत सावंतला vote करा! सिंगरसाठी धावून आली अभिनेत्री, म्हणते- "कारण नसताना वैभवने..."

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. यंदाच्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, आर्या जाधव आणि इरिना रुडाकोवा थेट नॉमिनेट झाले आहेत. यंदाच्या आठवड्यात या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार आहे. आता अभिजीतला व्होट करण्यासाठी मराठी अभिनेत्रीने आवाहन केलं आहे. 

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सोनाली पाटील हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधून तिने अभिजीत सावंतला व्होट करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. "नॉमिनेशनचा टास्क पार पडला आहे. वैभव, आर्या, इरिना आणि अभिजीतदादा नॉमिनेशनमध्ये आहेत. आपण सगळेच अभिजीतदादाला सपोर्ट करतोय. आर्यालाही आपण सपोर्ट करतोय. इरिनाचा गेम मला कधीच आवडला नाही. आणि वैभवचा गेम मला कधी आवडणार नाही. त्यामुळे त्या दोघांना व्होट करायचा विषयच नाही. आता राहिला प्रश्न अभिजीत सावंतचा...तर अभिजीत सावंत सगळ्यांचाच लाडका आहे. ज्याप्रकारे तो गेम खेळतोय...आणि त्याने त्याची मतंही व्यक्त केली आहेत," असं सोनाली म्हणाली. 


पुढे ती म्हणते, "कारण नसताना वैभवने अभिजीतला नॉमिनेट केलं होतं. त्याचा परतावा म्हणून आता त्याला नॉमिनेशनमध्ये टाकणं गरजेचं आहे. जर तसं मी नाही केलं तर माझ्यावर प्रेम करणारे लोक काय म्हणतील की एवढी संधी होती तरी मी नॉमिनेट केलं नाही, असं अभिजीत म्हणाला. अभिजीतने स्वत:बद्दलचा चांगला स्टँड घेतला आहे. त्यामुळे विषयच नाही. माझी खूप इच्छा आहे की वैभवने घराबाहेर जावं. पण, सगळ्या गेमचा विचार करता वैभव आता जाणार नाही. पण, मला वाटतं की इरिना घराबाहेर जाईल". 

दरम्यान, बिग बॉस मराठीचा पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील यांचा घरातील प्रवास संपला होता. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात योगिता चव्हाण आणि निखिल दामले यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. आता यंदाच्या आठवड्यात कोणाचा प्रवास संपतो, हे पाहावं लागेल. 
 

Web Title: bigg boss marathi 5 tv actress sonali patil request fans to vote for abhijeet sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.