निक्की स्पष्टच म्हणाली,"मी 'बिग बॉस मराठी'च्या घराची महाराणी"; होणार का आता ग्रुपचा गेम?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 03:22 PM2024-08-30T15:22:21+5:302024-08-30T15:22:39+5:30

आजच्या 'UNSEEN UNDEKHA'मध्ये निक्की अभिजीतला "मी 'बिग बॉस मराठी'च्या घराची राणी आहे, असं म्हणताना दिसतेय. 

Bigg Boss Marathi 5 UNSEEN UNDEKHA nikki tamboli says I am the queen of the house | निक्की स्पष्टच म्हणाली,"मी 'बिग बॉस मराठी'च्या घराची महाराणी"; होणार का आता ग्रुपचा गेम?

निक्की स्पष्टच म्हणाली,"मी 'बिग बॉस मराठी'च्या घराची महाराणी"; होणार का आता ग्रुपचा गेम?

Bigg Boss Marathi Day 34 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचं 24 तास नाट्य सुरूच असतं. त्यामुळे एपिसोड व्यरिक्त घरातील सदस्य काय धिंगाणा घालतात हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. आजच्या 'UNSEEN UNDEKHA'मध्ये निक्की अभिजीतला "मी 'बिग बॉस मराठी'च्या घराची राणी आहे, असं म्हणताना दिसतेय. 

'बिग बॉस मराठी'मध्ये अभिजीतशी गप्पा मारताना निक्की म्हणतेय, "मी ट्रॉमा नसता तर खरचं मी कालचा टास्क खेळले असते. काल माझ्यावर घरातील सर्व सदस्य हसत होते, खिल्ली उडवत होते. आजही मला हे सर्व जखमी प्राणी-पक्षी वाटतात. अभिजीतसोबत गेल्याने नॉमिनेट झाली, कॅप्टनसी गेली असं त्यांना वाटतं". 


निक्की पुढे म्हणते, "मी अरबाजला म्हणाले तुला जर असं वाटत असेल ना की सेफ व्हायला मी तुझ्यासोबत राहावं तर मला तुझ्यासोबत राहुन खेळ खेळायचा नाही. मला चॅलेंजेंस हवेत. माझा कणा मोडला तरी ताठ मानेने परत उभी राहील. काल मी हरले तरी मी ताठ मानेने उभी होते. राणी कायमच राणी असते. मी राणीच्या पदाला खाली आणणार नाही. मी बिग बॉस मराठीच्या घराची राणी आहे हाच गेम आहे". तर दुसरीकडे घरातील इतर सदस्य कालच्या टास्कबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. 


बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसांपासून दोन ग्रुप पडले होते. यात ग्रुप A मध्ये निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवी होते. B ग्रुपमध्ये अभिजीत आणि इतर मंडळी होते. आता A ग्रुपमधून निक्की आऊट झाली आहे. तर B ग्रुपमधून अभिजीत आऊट झालाय. लीडर्स वेगळे झाल्याने इतर सदस्य एक झाले आहेत. भांडण करणाऱ्या निक्कीला परत ग्रुपमध्ये घ्यायचं नाही, असं  A ग्रुपने ठरवलं आहे. आता निक्की आणि अभिजीज हे A आणि B ग्रुपचा गेम करणार का हेदेखील पाहावे लागेल. 

 

Web Title: Bigg Boss Marathi 5 UNSEEN UNDEKHA nikki tamboli says I am the queen of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.