रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपटं! बारामतीचा गडी वैभव चव्हाण इरिनाच्या प्रेमात? प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 02:20 PM2024-08-06T14:20:13+5:302024-08-06T14:20:41+5:30

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये वैभव चव्हाण आंणि इरिना रुडाकोव्हा यांच्यात प्रेमाचे वारे वाहत असल्याची चर्चा आहे (bigg boss marathi 5)

bigg boss marathi 5 vaibhav chavan love with irina rudacova colors marathi | रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपटं! बारामतीचा गडी वैभव चव्हाण इरिनाच्या प्रेमात? प्रोमो व्हायरल

रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपटं! बारामतीचा गडी वैभव चव्हाण इरिनाच्या प्रेमात? प्रोमो व्हायरल

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. यंदाच्या सीझनमध्ये घरात एकापेक्षा एक विभिन्न स्वभावाची माणसं दिसत आहेत. त्यामुळे पहिल्याच आठवड्यापासून घरात रंगत निर्माण झालीय. बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलचा बॉन्ड 'बिग बॉस'प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अशातच आता आणखी एक प्रेमकहाणी फुलतेय ती काय अशी शक्यता दिसतेय. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना मध्ये 'इलू इलू' सुरु असल्याची चर्चा पसरलीय.

वैभव इरिनाच्या प्रेमात पडलाय?

 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाचं वारंवार कौतुक करताना आणि तिला जास्त महत्त्व देताना दिसून येत आहे. प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणतोय,"कालपेक्षा जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होतंय". त्यावर इरिना 'हो' असं उत्तर देते. तर दुसरीकडे जान्हवी वैभवला म्हणते,"फॉरेनची पाटलीन मस्त आहे".



निक्कीने घेतली वैभवची शाळा

रांगड्या वैभवचा बदललेला स्वभाव पाहून निक्की तांबळीने त्याची चांगली शाळा घेतली. ती त्याला म्हणलाी ,"भाई...तुझं काय चाललंय". बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा यांच्यात खरंच प्रेम फुलतंय की नाटक आहे हे प्रेक्षकांना बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनच्या आगामी भागांमध्ये कळेल. दरम्यान आज घरात कॅप्टनसीची बुलेट ट्रेन हे कार्य रंगणार आहे. या कार्यादरम्यान सूरज आणि वैभवमध्ये भांडण झालेलं दिसतं.

Web Title: bigg boss marathi 5 vaibhav chavan love with irina rudacova colors marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.