Bigg Boss Marathi 5 : वर्षा ताईंमुळे निक्की आणि अरबाज यांच्यातील दुरावा होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 03:54 PM2024-08-23T15:54:16+5:302024-08-23T15:58:07+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात काही दिवसांपासून निक्की आणि अरबाजमध्ये अभिजीतमुळे खटके उडताना दिसत आहेत. त्यांच्यात एक दुरावा आला असून आजच्या भागात वर्षा ताई निक्की आणि अरबाजला समजावताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 5 : Varsha Tai will reduce the rift between Nikki and Arbaaz | Bigg Boss Marathi 5 : वर्षा ताईंमुळे निक्की आणि अरबाज यांच्यातील दुरावा होणार कमी

Bigg Boss Marathi 5 : वर्षा ताईंमुळे निक्की आणि अरबाज यांच्यातील दुरावा होणार कमी

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)ला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना 'बिग बॉस मराठी'चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता अभिजीत(Abhijeet Sawant)मुळे निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाज (Arbaz Patel) यांच्यात दुरावा येणार आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात काही दिवसांपासून निक्की आणि अरबाजमध्ये अभिजीतमुळे खटके उडताना दिसत आहेत. त्यांच्यात एक दुरावा आला असून आजच्या भागात वर्षा ताई निक्की आणि अरबाजला समजावताना दिसणार आहेत. वर्षा ताईंमुळे निक्की आणि अरबाज यांच्यातील दुरावा कमी होणार आहे.


वर्षा ताई म्हणत आहेत,"मी मोठी आहे असं म्हणता मग इथे तरी माझं ऐका". पुढे निक्की म्हणते,"मी अरबाजला विचारलं की तुला बरं वाटतंय का आता". त्यावर वर्षा ताईंसमोर अरबाज म्हणतो,"ठिके". वर्षा ताई म्हणतात,"त्याला खूप छान वाटतंय..त्याची गळाभेट घे". निक्की आणि अरबाजचा अबोला मिटल्याने घरातील सर्व सदस्यदेखील आनंदी होतात.

डीपीने निक्कीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत घातलं गाऱ्हाणं
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज निक्कीचा जल्लोषात वाढदिवस साजरा होणार आहे. आजच्या भागात निक्कीच्या वाढदिवसानिमित्त डीपी दादांनी खास गाऱ्हाणं घातलेलं पाहायला मिळणार आहे. निक्कीला शुभेच्छा देत डीपी दादा म्हणत आहेत,"वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. ७५ वर्षे जग.. तुझं असचं तारुण्य टिकूदेत. लोकांना छळू नकोस. त्यांना त्रास देऊ नकोस. लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक. पण कोणाला काही मानसिक त्रास देऊ नकोस. तुला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा...शुभेच्छूक साधासुधा एक पलिकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस". 
 

Web Title: Bigg Boss Marathi 5 : Varsha Tai will reduce the rift between Nikki and Arbaaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.