कोण होणार घराचा कॅप्टन? टास्कदरम्यान वर्षाताई आणि पॅडीमध्ये तूतू मैमै, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 09:37 AM2024-09-20T09:37:13+5:302024-09-20T09:38:13+5:30

टास्कमध्ये अरबाज आणि निक्कीमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. तर वर्षाताई आणि पॅडीमध्येही तू तू मै मै झाल्याचं दिसत आहे. आता या टास्कमध्ये कोण बाजी मारून घराचा कॅप्टन होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

bigg boss marathi 5 varsha usgaonkar paddy kambale cat fight during captaincy task | कोण होणार घराचा कॅप्टन? टास्कदरम्यान वर्षाताई आणि पॅडीमध्ये तूतू मैमै, प्रोमो समोर

कोण होणार घराचा कॅप्टन? टास्कदरम्यान वर्षाताई आणि पॅडीमध्ये तूतू मैमै, प्रोमो समोर

Bigg Boss Marathi Season 5 : यंदाच्या आठवड्यातील कॅप्टन्सी पदासाठी बिग बॉस मराठीच्या घरात टास्क रंगला आहे. घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सी टास्कमधून सदस्यांना बाद करण्यासाठी टीम A आणि टीम B मध्ये टास्क रंगला होता. अंड्याचा फंडा टास्कमध्ये दुसऱ्या स्पर्धकाच्या घरट्यात अंड ठेवून त्या सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद करायचं होतं. या टास्कमध्ये टीम B मधील अभिजीत, अंकिता, जान्हवी, पॅडी आणि संग्राम हे सदस्य बाद झाले.

रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर निक्कीला शिक्षा दिल्याने ती कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद झाली आहे. त्यामुळे आता अरबाज, वर्षा, सूरज आणि धनंजय यांच्यात कॅप्टन्सीसाठी शर्यत रंगणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कॅप्टन्सी शर्यतीत असलेल्या सदस्यांकडे पाण्याचे जार देण्यात आल्याचं दिसत आहे. या सदस्यांना घरातील इतर सदस्यांना त्यांचं मत पटवून द्यायचं आहे. 


यामध्ये अरबाज आणि निक्कीमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. तर वर्षाताई आणि पॅडीमध्येही तू तू मै मै झाल्याचं दिसत आहे. आता या टास्कमध्ये कोण बाजी मारून घराचा कॅप्टन होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात वैभव चव्हाणचा घरातील प्रवास संपला. तर निक्कीच्या कानाखाली मारल्याने आर्याला घरातून एक्झिट घ्यावी लागली. या आठवड्यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत. आता यातील कोणाचा प्रवास संपतो, हे पाहावं लागेल. 
 

Web Title: bigg boss marathi 5 varsha usgaonkar paddy kambale cat fight during captaincy task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.