ना स्पेशल डाएट, ना जिम! ५६व्या वर्षाही इतकी सुंदर कशी दिसते वंडर गर्ल? बिग बॉसच्या घरात केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 01:01 PM2024-09-03T13:01:21+5:302024-09-03T13:01:39+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : खेळाबरोबरच वर्षा उसगावकर त्यांच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतात. साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्षा उसगावकर आजही एकदम फिट आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांनी सौंदर्य आणि फिटनेसमागचं रहस्य सांगितलं आहे. 

bigg boss marathi 5 varsha usgaonkar revealed secret behind her beauty and fitness | ना स्पेशल डाएट, ना जिम! ५६व्या वर्षाही इतकी सुंदर कशी दिसते वंडर गर्ल? बिग बॉसच्या घरात केला खुलासा

ना स्पेशल डाएट, ना जिम! ५६व्या वर्षाही इतकी सुंदर कशी दिसते वंडर गर्ल? बिग बॉसच्या घरात केला खुलासा

Bigg Boss Marathi Season 5 : मराठी सिनेसृष्टीची वंडर गर्ल असणाऱ्या आणि अभिनय, सौंदर्याने ९०चं दशक गाजवलेल्या वर्षा उसगावकर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्या आहेत. पहिल्या दिवसापासूनच त्या बिग बॉसच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी एक आहेत. अभिनयाने सिनेसृष्टी गाजवलेल्या वर्षा घरातील सदस्यांनाही त्यांच्या भाषेत अगदी चोख उत्तर देतात. खेळाबरोबरच वर्षा उसगावकर त्यांच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतात. साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्षा उसगावकर आजही एकदम फिट आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांनी सौंदर्य आणि फिटनेसमागचं रहस्य सांगितलं आहे. 

वर्षा उसगावकर यांचा बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्या कॅरमल कस्टर्ड खाताना दिसत आहेत. जान्हवी आणि मी मिळून हे कस्टर्ड बनवल्याचं त्या व्हिडिओत म्हणत आहे. हे सांगतानाच त्यांनी त्यांच्या सौंदर्यामागच्या रहस्याचा खुलासाही केला आहे. पन्नाशी ओलांडलूनही इतकी सुंदर कशी? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी चाहत्यांना दिलं आहे. 


"तुम्हाला कळलंच असेल माझ्या सौंदर्याचं रहस्य...सगळे मला विचारतात की तुम्ही इतक्या सडपातळ कश्या...सगळ्यांना वाटतं की मी दुसऱ्यांना याबाबत सांगत नाही किंवा डाएट करते. पण, तुम्ही बघतच असाल की मी सगळं खाते. प्राणायाम, योगासन आणि घरचं जेवण हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे", असं वर्षा उसगावकर म्हणाल्या. 

दरम्यान, या आठवड्यात वर्षा उसगावकर घराच्या कॅप्टन आहेत. त्यामुळे त्या नॉमिनेशनपासून सेफ आहेत. तर या आठवड्यात  घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 

Web Title: bigg boss marathi 5 varsha usgaonkar revealed secret behind her beauty and fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.