"तिचं सॉरी पण नाटकी होतं", जान्हवीबद्दल विशाखा सुभेदारांचं स्पष्ट मत, म्हणाल्या- "तिच्या नवऱ्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 04:28 PM2024-10-04T16:28:09+5:302024-10-04T16:29:13+5:30

अभिनेत्री विशाखा सुभेदार पॅडीला वेळोवेळी पाठिंबा देताना दिसून आली. आता पॅडी बाहेर आल्यानंतर विशाखाने जान्हवी किल्लेकरबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

bigg boss marathi 5 vishakha subhedar wanted to meet janhavi killekar said she did drama paddy kambale | "तिचं सॉरी पण नाटकी होतं", जान्हवीबद्दल विशाखा सुभेदारांचं स्पष्ट मत, म्हणाल्या- "तिच्या नवऱ्याने..."

"तिचं सॉरी पण नाटकी होतं", जान्हवीबद्दल विशाखा सुभेदारांचं स्पष्ट मत, म्हणाल्या- "तिच्या नवऱ्याने..."

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व अंतिम टप्प्यात आहे. या सीझनचा फिनाले अवघ्या २ दिवसांवर आला आहे. गेल्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळेने 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेतला. सुरुवातीला घरात शांत दिसणाऱ्या पॅडीने नंतर मात्र त्याचा खेळ दाखवला. उत्तम खेळीने पॅडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. पण, खेळ अंतिम टप्प्यात असताना त्याला घराचा निरोप घ्यावा लागला. अभिनेत्री विशाखा सुभेदार पॅडीला वेळोवेळी पाठिंबा देताना दिसून आली. आता पॅडी बाहेर आल्यानंतर विशाखाने जान्हवी किल्लेकरबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात जान्हवीने पॅडीला त्याच्या अभिनयावरुन हिणवलं होतं. यामुळे जान्हवीला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता. विशाखानेही त्याबाबत पोस्ट लिहिली होती. त्यानंतर जान्हवीने पॅडीची माफीही मागितली होती. पण, ते सगळं नाटक असल्याचं विशाखाने 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्याबरोबरच जान्हवी घराबाहेर आल्यानंतर तिला भेटून याची जाणीव करून देणार असल्याचंही तिने म्हटलं आहे. 

विशाखा म्हणाली, "जान्हवी सॉरी म्हणाली तेदेखील मला पटत नव्हतं. दु:खी, कष्टी होऊन सॉरी म्हणाली असं वाटत नव्हतं. सगळं मला नाटकी आणि खोटं वाटत होतं. ती बरी पण अभिनेत्री नसावी. कारण तेदेखील चांगलं वाटलं नाही. जान्हवी बाहेर आल्यावर मी तिला भेटणार आहे. तिच्या नवऱ्याची मुलाखत पण मी ऐकली. त्याचेही मुद्दे बरोबर असतील. पण, रागाच्या भरात नॅशनल टीव्हीवर काय बोलावं, याचा तिने विचार केला पाहिजे. याचं भान तिने ठेवलं पाहिजे. तुझं वय काय आणि समोरच्या माणसाचं काय, याचा पण विचार तिने केला पाहिजे. ती ज्या पद्धतीने सॉरी बोलली तो गेम होता. ते मला अजिबातच पटलेलं नव्हतं. मला माहीत नाही तिला खरंच मनापासून सॉरी वाटलं की नाही ते...पण, ते फिलिंग तिला मला बाहेर आल्यावर करवून द्यायचं आहे".

६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. वर्षा उसगावकर यांनी गुरुवारी(३ ऑक्टोबर) बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. आज आणखी एक सदस्य 'बिग बॉस मराठी'चा निरोप घेणार आहे. त्यामुळे या सीझनचे टॉप ५ आज मिळणार आहेत. 

Web Title: bigg boss marathi 5 vishakha subhedar wanted to meet janhavi killekar said she did drama paddy kambale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.