Bigg Boss Marathi 5 : "जास्त बोलणार तर तोंड करपणार", असं का सूरज म्हणतोय पॅडी दादाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 18:08 IST2024-09-04T18:07:46+5:302024-09-04T18:08:41+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात सर्वच सदस्य धुमाकूळ घातलाना दिसणार आहेत. तर दुसरीकडे गंमतीत पॅडी दादा सूरजवर चिडलेला दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 5 : "जास्त बोलणार तर तोंड करपणार", असं का सूरज म्हणतोय पॅडी दादाला?
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा (Bigg Boss Marathi Season 5) सहावा आठवडा देखील दणक्यात सुरू झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला. आज घरात सर्वच सदस्य धुमाकूळ घातलाना दिसणार आहेत. तर दुसरीकडे गंमतीत पॅडी दादा सूरजवर चिडलेला दिसणार आहे.
बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये वर्षा ताई सूरजला जेवायला बोलवत आहेत. वर्षा ताईनी फक्त सूरजला बोलावल्याने पॅडी दादा मात्र नाराज झालेले आहेत. त्यांनी आपली नाराजीदेखील व्यक्त केली आहे. त्यावर वर्षाताई पॅडी दादाला सॉरी म्हणाल्या आणि मला माफ कर रे असं म्हणाल्या. त्यावर पॅडी दादा म्हणाला, फक्त वाईट वाटतं. तर दुसरीकडे सूरजला असं वाटत आहे की पॅडी दादा त्याच्यावर जळत आहेत. तो म्हणाला की, कशाला जळताय. त्यानंतर पॅडी दादा म्हणाला की, जा जळजळ कमी होईल. त्यानंतर सूरज म्हणाला की, जास्त बोलणार तर तोंड करपणार.
बीबी फार्ममध्ये सदस्य घालणार राडा
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात सदस्य बीबी फार्ममध्ये राडा करताना दिसणार आहेत. बीबी फार्ममधून जास्तीत जास्त दूध गोळा करताना कल्ला करणार आहेत. कोणती टीम बीबी फार्ममधून दूध गोळा करण्यात बाजी मारेल याकडे सगळ्यांचे आता लक्ष लागलं आहे. या टास्कमध्ये घरातील सर्वच सदस्य जोरदार राडा करताना दिसणार आहेत.
या आठवड्यात कोण जाणार घराबाहेर?
'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या सात जणांमध्ये घराबाहेर कोण जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.