लयभारी! 'गुलीगत किंग' सूरज चव्हाणला भेट मिळाली नवी स्कूटी; फोटो शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:47 PM2024-10-23T12:47:15+5:302024-10-23T12:51:04+5:30

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) सीझन ५ चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं आहे.

bigg boss marathi 5 winner suraj chavan got a new scooty photo viral on social media | लयभारी! 'गुलीगत किंग' सूरज चव्हाणला भेट मिळाली नवी स्कूटी; फोटो शेअर करत दिली माहिती

लयभारी! 'गुलीगत किंग' सूरज चव्हाणला भेट मिळाली नवी स्कूटी; फोटो शेअर करत दिली माहिती

Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) सीझन ५ चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं आहे. बारामतीच्या छोट्याश्या गावातून आलेल्या या पठ्ठ्याने आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने प्रेक्षकांना आपलसं केलं. टिक टॉकवरील व्हिडीओंमुळे सूरज सोशल मीडियावर प्रसिद्धीझोतात आला. आपल्या झापूक झूपूक अंदाजाने त्याने सर्वांना वेड लावलं होतं. सूरज गरिबीतून वर आलेला असल्याने आणि अगदी निर्मळ मनाचा असल्याने महाराष्ट्रातील जनतेने त्यालाच पाठिंबा दिला.


'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने आपलं नाव कोरलं. शो जिंकल्यावर सूरज चव्हाणला १४.६ लाख रुपये मिळाले आहेत. ट्रॉफी आणि रोख रक्कमबरोबरच इलेक्ट्रिक स्कूटर आणि आकर्षक ज्वेलरीही त्याला मिळणार आहे. नुकतेच सूरजने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये सूरज नव्याकोऱ्या स्कुटीसोबत फोटो काढल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकतीच सुरजला इलेक्ट्रिक स्कुटर भेट मिळाली. सूरजने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. या फोटोंमध्ये सूरज आनंदी असल्याचं पाहायला मिळतंय. पूजा आणि झेंडूचा हार घालून नव्या स्कुटीबरोबर गुलीगत किंगने छान फोटो काढलेत. "Thank you so much Tunwal emotors" असं कॅप्शन देत सूरज चव्हाणने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर सूरजवर संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Web Title: bigg boss marathi 5 winner suraj chavan got a new scooty photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.