बिग बॉसनंतर कोणी 'बच्चा' भेटलंय का? सूरज लाजत म्हणाला- "लय पोरींचे मॅसेज येतात पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 12:22 PM2024-10-20T12:22:18+5:302024-10-20T12:22:50+5:30

सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात त्याला लग्न करायचं असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर सूरजने भाष्य केलंय (suraj chavan)

bigg boss marathi 5 winner suraj chavan talk about his marriage | बिग बॉसनंतर कोणी 'बच्चा' भेटलंय का? सूरज लाजत म्हणाला- "लय पोरींचे मॅसेज येतात पण..."

बिग बॉसनंतर कोणी 'बच्चा' भेटलंय का? सूरज लाजत म्हणाला- "लय पोरींचे मॅसेज येतात पण..."

सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचं विजेतेपद पटकावलं. सूरज विजयी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालाय. सूरज जिंकल्यामुळे दररोज त्याला महाराष्ट्रातून तमाम लोक भेटायला येत आहेत. सूरजसोबत सेल्फी काढत, कोणी त्याला मिठाई भरवत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात सूरजने अनेकदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केलीय. नुकत्याच एका मुलाखतीत सूरजने याविषयी सविस्तर खुलासा केलाय.

सूरज लग्नाबद्दल काय म्हणाला?

सूरजने अलीकडेच माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केलाय. लग्नाचा विषय काढताच सूरज लाजत म्हणाला, "बच्चा बिच्चा काय भेटला नाय. पण मॅसेज लय येतात मला. पण मी सांगितलंय की साधी, सिंपल, साडी घालणारी मुलगी मी करणार. कारण कसंय, आमची आत्या आणि बहिणी बिग बॉसच्या घरात कशा आलेल्या तसं आवडतं माझ्या घरच्यांना. मी साधीच मुलगी बघणार आणि शुभमंगल सावधान करणार."


 

सूरज सध्या काय करतोय?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचं सूरजने विजेतेपद पटकावलं. साधेपणा अन् तरीही टास्कमध्ये उत्कृष्ट खेळून सूरजने हे बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकलं. टॉप २ मध्ये सूरज आणि अभिजीत होते. परंतु सूरजने बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची ट्रॉफी पटकावली. सूरज सध्या त्याच्या गावच्या घरी अर्थात बारामतीला असतो. सूरजची भूमिका असलेला 'राजा राणी' सिनेमा २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरजला घेऊन केदार शिंदेंनी 'झापुकझुपुक' सिनेमाची घोषणा केलीय. 

Web Title: bigg boss marathi 5 winner suraj chavan talk about his marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.