'बिग बॉस'ची ट्रॉफी घेऊन जेजुरी गडावर गेला सूरज चव्हाण, घेतलं खंडोबाचं दर्शन!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 06:22 PM2024-10-08T18:22:41+5:302024-10-08T18:23:37+5:30
'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी घेऊन सुरज हा थेट जेजुरी गडावर पोहचला आहे.
'बिग बॉस मराठी ५' विजेता सूरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. सूरज चव्हाणने त्याच्या विशेष स्टाइलने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. गावाकडून आलेल्या साध्या घरात राहणाऱ्या सुरज चव्हाणवर अख्खा महाराष्ट्र प्रेम करतोय. 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच एका रीलस्टारने 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी जिंकली आहे. आता 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी घेऊन सुरज हा थेट जेजुरी गडावर पोहचला आहे.
'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी घेऊन सुरज थेट जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी पोहचला. सुरज एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी घेऊन जेजुरी गडावर गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसतेय. तसेच 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष करताना सुरज पाहायला मिळाला. याआधी सुरजने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात नतमस्तक होत दर्शन घेतलं होतं.
सुरजचा आतापर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता 'बिग बॉस'चा किंग ठरला आहे. त्याला बक्षीसात १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आहे. त्यासोबत मानाची ट्रॉफी, दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि इलेक्ट्रिक बाईकदेखील मिळाली आहे. बारामतीच्या एका छोट्याश्या गावातला मुलाने मारलेली मजल पाहून त्यांचं सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.