Bigg boss marathi: 'जो स्वत:चा होऊ शकला नाही तो तुमचा काय होणार'; स्नेहा-अविष्कारमध्ये वादाची ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 11:50 IST2021-09-29T11:50:15+5:302021-09-29T11:50:46+5:30
Bigg boss marathi : 'बिग बॉस'च्या घरात सध्या हल्लाबोल हे कार्य सुरु असून यात दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. यात पहिल्या खेळात सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील मोटर बाईकवर बसून त्यांनी खेळाला सुरुवात केली.

Bigg boss marathi: 'जो स्वत:चा होऊ शकला नाही तो तुमचा काय होणार'; स्नेहा-अविष्कारमध्ये वादाची ठिणगी
छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. स्पर्धकांनी घरात प्रवेश करुन दोन आठवडे झाले आहेत. त्यामुळे आता या घरात खरे डाव रंगू लागले आहेत. टास्क खेळण्यासोबतच प्रत्येक स्पर्धकाचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. त्यामुळे या घरात आता दोन गट पडल्याचं दिसून येतं. त्यातच घरातील सदस्यांनी 'हल्लाबोल' हे नवीन कार्य सोपवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा टास्क सुरु असताना स्नेहाने अविष्कार दारव्हेकरला चांगला सणसणीत टोला लगावला आहे.
'बिग बॉस'च्या घरात सध्या हल्लाबोल हे कार्य सुरु असून यात दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. यात पहिल्या खेळात सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील मोटर बाईकवर बसून त्यांनी खेळाला सुरुवात केली. त्यानंतर विकास आणि विशाल या खेळात सहभागी झाले. परंतु, त्यांनी या बाईकवरुन उठवण्यासाठी घरातील अन्य स्पर्धक कसोशीने प्रयत्न करताना दिसणार आहेत.
'तो फक्त खेळातील जोकर'; चाहत्याच्या चुगलीमुळे जय-विशालच्या मैत्रीत फूट?
विशेष म्हणजे विकास आणि विशालला धीर देण्यासाठी अविष्कार पुढे आला. “मी रेडी आहे खेळायला, पण आता तुम्हाला खेळायचे आहे, असं अविष्कारने विकास, विशालला सांगितलं. मात्र, अविष्कारचे हे बोल ऐकल्यावर तिने चांगलाच टोला लगावला.
“जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार”? , असं स्नेहा म्हणाली. त्यामुळेच स्नेहाच्या या टोमण्यावर अविष्कार नेमकं कसं आणि काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.