"ती गेली तेव्हा...", आस्ताद काळेला मातृशोक; आईच्या आठवणीत अभिनेता भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 10:51 AM2023-12-31T10:51:56+5:302023-12-31T10:52:36+5:30

आस्ताद काळेच्या आईचं निधन, अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

bigg boss marathi fame aastad kale mother passed away actor shared emotional post | "ती गेली तेव्हा...", आस्ताद काळेला मातृशोक; आईच्या आठवणीत अभिनेता भावुक

"ती गेली तेव्हा...", आस्ताद काळेला मातृशोक; आईच्या आठवणीत अभिनेता भावुक

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आस्तादच्या आईचं निधन झालं आहे. काही दिवसांपू्र्वीच आस्तादची आई सुनिता काळे यांनी जगाचा निरोप घेतला. आईच्या निधनानंतर आस्तादने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

आस्तादने त्याच्या फेसबुकवरुन पोस्ट शेअर केली आहे. "ती गेली...तेव्हा..." असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. आईच्या आठवणीत आस्तादने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.

"...म्हणूनी घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून" असं म्हणत आस्ताद भावुक झाला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत आस्तादच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. 

आस्तादचे वडील प्रमोद काळे यांनी फेसबुकवरुन पत्नी सुनिता काळे यांच्या निधनाची बातमी दिली होती. पत्नीबरोबरचा फोटो शेअर करत "माझ्या प्रिये गुडबाय...पुन्हा कधीतरी नक्की भेटू, तेव्हा राहिलेलं सगळं बोलू" असं म्हटलं आहे. सुनिता काळे यांच्या निधनाने आस्ताद आणि त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

आस्ताद आणि त्याच्या आईचं नातं फार खास होतं. अनेकदा आस्ताद आईबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसायचा. आता आईच्या आठवणीत आस्ताद भावुक झाला आहे.  त्याच्या पोस्टने चाहतेही हळहळले आहेत. 
 

Web Title: bigg boss marathi fame aastad kale mother passed away actor shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.