"नटीने मारली मिठी" गाण्यावर अभिजीत सावंतने बनवला रील, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 14:50 IST2025-04-20T14:49:45+5:302025-04-20T14:50:06+5:30

'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत सावंतने "नटीने मारली मिठी" गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

bigg boss marathi fame abhijeet sawant dance on natine marli mithi song video | "नटीने मारली मिठी" गाण्यावर अभिजीत सावंतने बनवला रील, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू

"नटीने मारली मिठी" गाण्यावर अभिजीत सावंतने बनवला रील, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू

सोशल मीडियावरचा ट्रेंड दिवसेंदिवस बदलत असतो. रोज काही ना काहीतरी नवीन सोशल मीडियावर पाहायला मिळतं. सध्या गेल्या काही दिवसांपासून एक गाणं ट्रेंड होताना दिसत आहे. इन्स्टाग्राम उघडलं की त्या गाण्यावर रील समोर येतं. ते गाणं म्हणजे "नटीने मारली मिठी". या गाण्यावरची हुक स्टेपही प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक कलाकारांनाही या गाण्यावर रील व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. 

आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत सावंतने "नटीने मारली मिठी" गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिजीत रुममध्ये डान्स करताना दिसत आहे. त्याबरोबरच "नटीने मारली मिठी" या गाण्याच्या हुकस्टेपही तो करत आहे. अभिजीत हा मजेशीर रील पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 


अभिजीत हा लोकप्रिय सिंगर आहे. 'इंडियन आयडॉल १'चं विजेतेपद मिळवण्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला होता. अनेक गाणी त्याने गायली आहेत. याशिवाय काही अल्बममधील गाण्यांनाही त्याने आवाज दिला आहे. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये अभिजीत सहभागी झाला होता. या पर्वाचा तो उपविजेता ठरला होता. 

Web Title: bigg boss marathi fame abhijeet sawant dance on natine marli mithi song video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.