चुलीवरच जेवण अन् हाताने थापलेली भाकरी; 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याच्या साधेपणाचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 02:00 PM2024-07-19T14:00:31+5:302024-07-19T14:04:42+5:30

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता शिव ठाकरे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो.  

bigg boss marathi fame actor shiv thakare make food in her village video goes viral on social media | चुलीवरच जेवण अन् हाताने थापलेली भाकरी; 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याच्या साधेपणाचं होतंय कौतुक

चुलीवरच जेवण अन् हाताने थापलेली भाकरी; 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याच्या साधेपणाचं होतंय कौतुक

Shiv Thakre Viral Video: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता शिव ठाकरे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो.  शिव ठाकरे हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तो 'बिग बॉस १६' मध्ये दिसला.  त्यानंतर सलमान खानच्या या रिॲलिटी शोने त्याला चांगलीच ओळख मिळवून दिली. यासोबतच तो रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी सीझन १३'मध्ये झळकला. आपला साधेपणा, मनमिळाऊ स्वभावामुळे अभिनेत्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तसेच शिव ठाकरेने त्याचं नृत्यकौशल्य तसेच दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंस केलं. दरम्यान, सोशल मीडियावर शिव ठाकरेचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्याचा हा व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अलिकडे शिवने त्याच्या मुळगावी भेट दिली होती. त्याचे फोटो त्याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांसोबत शेअर केले होते.  त्याच दरम्यान तो गावाकडे रमल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.  गावचं जीवन अनुभवताना एका घरामध्ये शिव वृद्ध महिलेसोबत चुलीवरचं जेवण बनवताना दिसत आहे. व्हिडीओनुसार, अभिनेत्याने चक्क हाताने भाकरी थापली आहे. शिवच्या या साधेपणाचं नेटकऱ्यांनी तोंडभरून कौतुक केलंय. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मातीशी नाळ जोडून राहण्याची त्याची ही वृत्ती नेटकऱ्यांना भावली आहे.

'Marathicelebkatta' या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शिवचा हा व्हायरल व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Web Title: bigg boss marathi fame actor shiv thakare make food in her village video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.