नाकात नथ अन् डोक्यावर पदर, फोटोतील या चिमुकलीला ओळखलं का? अभिनेत्रीने गाजवलंय 'बिग बॉस'चं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 02:32 PM2024-07-18T14:32:50+5:302024-07-18T14:33:35+5:30

सध्या एका अभिनेत्रीच्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोतील ही अभिनेत्री तुम्हाला ओळखू येतेय का?

bigg boss marathi fame actress amruta deshmukh shared her childhood photos | नाकात नथ अन् डोक्यावर पदर, फोटोतील या चिमुकलीला ओळखलं का? अभिनेत्रीने गाजवलंय 'बिग बॉस'चं घर

नाकात नथ अन् डोक्यावर पदर, फोटोतील या चिमुकलीला ओळखलं का? अभिनेत्रीने गाजवलंय 'बिग बॉस'चं घर

अनेक सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. कलाकार लहानपणी कसे दिसायचे? काय करायचे? त्यांच्या कुटुंबात कोण कोण असतं? हे जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. अनेकदा कलाकारही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स देत असतात.

सध्या एका अभिनेत्रीच्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक गोड चिमुकली दिसत आहे. या चिमुकलीने काळ्या रंगाची साडी नेसल्याचं दिसत आहे. मोत्यांचे दागिने आणि नाकात नथ घालत तिने मराठमोळा लूक केला आहे. डोक्यावर पदर घेत फोटोसाठी पोझ दिली आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीचा हा गोड फोटो पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. 

या फोटोत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अमृता देशमुख आहे. अमृताने नुकतेच हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अमृताने 'फ्रेशर्स', 'तुमचं आमचं सेम असतं', 'मी तुझीच रे', 'अस्मिता' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्वीटी सातारकर' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती. 'बिग बॉस मराठी ४'मुळे अमृता सहभागी झाली होती. 'बिग बॉस'च्या घरातच तिचे प्रसाद जवादेशी प्रेमसंबंध जुळले. काही महिन्यांपूर्वीच अमृता-प्रसादने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 
 

Web Title: bigg boss marathi fame actress amruta deshmukh shared her childhood photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.