शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 16:30 IST2025-04-20T16:29:39+5:302025-04-20T16:30:00+5:30
'बिग बॉस मराठी' फेम शर्मिष्ठा राऊतने आनंदाची बातमी दिली आहे. शर्मिष्ठा आई झाली आहे. तिला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
'बिग बॉस मराठी' फेम शर्मिष्ठा राऊतने आनंदाची बातमी दिली आहे. शर्मिष्ठा आई झाली आहे. तिला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. लग्नानंतर ४ वर्षांनी शर्मिष्ठाच्या घरी पाळणा हलला. शर्मिष्ठाच्या लेकीचं बारसंही नुकतंच पार पडलं. यातील काही खास क्षण समोर आले आहेत.
शर्मिष्ठा आणि तेजस देसाई आईबाबा झाले आहेत. मोठ्या थाटामाटात त्यांनी लेकीचं बारसं केलं. बारशासाठी शर्मिष्ठा आणि तेजसने ट्विनिंग केलं होतं. त्यांचे कपडे खास डिझाईन केले होते. शर्मिष्ठाने पांढऱ्या आणि लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर तेजसने त्याच रंगाचा कुर्ता परिधान केला होता. आपल्या लेकीचं नावही त्यांनी रुंजी असं ठेवलं आहे. शर्मिष्ठा आणि तेजस यांच्या लेकीच्या बारश्याच्या सोहळ्यातील व्हिडिओ समोर आले आहेत. यावर चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी लॉकडाऊनमध्ये लग्न केलं होतं. ऑक्टोबर २०२०मध्ये लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता आईबाबा झाल्यानंतर त्यांची नवी इनिंग सुरू झाली आहे.