'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची 'आई बाबा रिटायर होत आहेत' मालिकेत वर्णी; साकारणार 'ही' महत्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 16:43 IST2024-12-02T16:37:23+5:302024-12-02T16:43:24+5:30
स्टार प्रवाहवरील 'आई बाबा रिटायर होत आहेत!' या मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री.

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची 'आई बाबा रिटायर होत आहेत' मालिकेत वर्णी; साकारणार 'ही' महत्वपूर्ण भूमिका
Aai Baba Retire Hot Aahet: छोट्या पडद्यावर टीआरपीसाठी चढाओढ असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. एकामागोमाग नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिकाविश्वात स्टार प्रवाहवरील 'आई बाबा रिटायर होत आहेत!' (Aai Baba Retire Hot Aahet) या मालिकेची जोरदार चर्चा होताना दिसते. अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांच्यासह मंगेश कदम (Mangesg Kadam) यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीकडून या मालिकेतील स्टार कास्टबद्दल उलगडा करण्यात आला होता.
'आई बाबा रिटायर होत आहेत!' या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ, मंगेश कदम तसेच अभिनेता हरिश दुधाडे, प्रतिक्षा जाधव यांच्यासोबतच 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता झळकणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आदिश वैद्य (Adish Vaidy)आहे. आदिशने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. मकरंद किल्लेदार असं त्याच्या पात्राचं नाव आहे.
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' ही बहुप्रतीक्षित मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाणार असल्याचं कळतंय. 'स्टार प्रवाह' वाहिनीवर आज २ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.