अमृता देशमुख-प्रसाद जवादेने गुपचूप उरकला साखरपुडा, अभिनेत्रीचा भाऊ कमेंट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 14:35 IST2023-07-22T14:33:49+5:302023-07-22T14:35:19+5:30
अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या साखरपुड्याच्या फोटोंवर अभिषेकची कमेंट, म्हणाला...

अमृता देशमुख-प्रसाद जवादेने गुपचूप उरकला साखरपुडा, अभिनेत्रीचा भाऊ कमेंट करत म्हणाला...
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. बिग बॉसनंतरही अमृता आणि प्रसाद एकमेकांना डेट करत होते. अनेकदा ते सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायचे. आता त्यांनी प्रेमाची कबुली देत साखरपुडा केल्याची माहिती दिली आहे. याबरोबरच त्यांनी लग्न करणार असल्याचंही सांगितलं आहे.
अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रसादबरोबरचे फोटो शेअर करत साखरपुडा केल्याचं सांगितलं आहे. या फोटोंमध्ये अमृता आणि प्रसादेन रिंगही दाखविली आहे. अमृता-प्रसादच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताचा भाऊ आणि आई कुठे काय करते फेम अभिषेक देशमुखनेही या नव्या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे. अमृताच्या या फोटोंवर अभिषेकने केलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
“नजर लागायला नको”, निवेदिता-अशोक सराफ यांच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
“इर्शाळवाडीशी माझा खूप जवळचा संबंध आहे”, जुई गडकरी भावुक, म्हणाली, “मी गेल्याच वर्षी...”
अभिषेकने कमेंट करत “मनापासून अभिनंदन...बाकी शुभेच्छा भेटून”, असं म्हटलं आहे. त्याच्या या कमेंटवर प्रसादने इमोजी शेअर करत रिप्लाय दिला आहे. अमृता-प्रसादच्या या गुडन्यूजने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अमृता आणि प्रसाद १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.