एक हजारों में मेरी बहना है! 'कोकण हार्टेड गर्ल'कडून लाडक्या बहिणीला सरप्राइज, घेऊन दिला iPhone 16

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 09:27 AM2024-10-17T09:27:45+5:302024-10-17T09:35:15+5:30

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

bigg boss marathi fame ankita walawalkar gave iPhone 16 as a surprise to her beloved sister netizens react video viral on social media | एक हजारों में मेरी बहना है! 'कोकण हार्टेड गर्ल'कडून लाडक्या बहिणीला सरप्राइज, घेऊन दिला iPhone 16

एक हजारों में मेरी बहना है! 'कोकण हार्टेड गर्ल'कडून लाडक्या बहिणीला सरप्राइज, घेऊन दिला iPhone 16

Ankita Walawalkar: 'बिग बॉस मराठी' (bigg boss marathi ) फेम सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) कायमच चर्चेत येत असते. आपल्या दमदार खेळीने अंकिताने 'बिग बॉस'चं घर गाजवलं. शिवाय तिने प्रेक्षकांची मनावरही राज्य केलं. सध्या 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिता तिचा क्वालिटी टाईम लाडक्या बहिणींसोबत स्पेंड करताना दिसते आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अंकिताचं कौतुक करताना दिसत आहेत.


अंकिताने सोशल मीडियावर तिच्या बहिणींसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती लहानबहिणींना मॉलची सफर घडवताना दिसते आहे. इतकंच नाही तर लाडक्या बहिणीसाठी तिने हे गिफ्ट दिल्याचं पाहायला मिळतंय. "And our lil one upgraded to i phn 16 plus" असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय. प्राजक्ता आणि ऋतुजा अशी अंकिताच्या बहिणींची नावं आहेत. कोकण हार्टेड गर्लचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताने 'बिग बॉस मराठी' शोमध्ये आपल्या मालवणी बोलीने सर्वांचंच लक्ष वेधलं आणि ती घराघरात पोहचली.अशातच घराबाहेर येताच अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात ती लग्नबंधनात अडकणार आहे.

Web Title: bigg boss marathi fame ankita walawalkar gave iPhone 16 as a surprise to her beloved sister netizens react video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.