Bigg boss marathi: इतर स्पर्धकांपेक्षा गायत्री सरस; 'या' गोष्टींमुळे ठरली उत्तम संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 06:00 PM2021-11-30T18:00:00+5:302021-11-30T18:00:00+5:30

Gayatri datar:बिग बॉसच्या घरात रंगणाऱ्या प्रत्येक टास्कमध्ये खेळाडूच्या संयमाची कसोटी पाहिली जाते. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३' मधील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

bigg boss marathi fame gayatri datar A shower of appreciation | Bigg boss marathi: इतर स्पर्धकांपेक्षा गायत्री सरस; 'या' गोष्टींमुळे ठरली उत्तम संचालक

Bigg boss marathi: इतर स्पर्धकांपेक्षा गायत्री सरस; 'या' गोष्टींमुळे ठरली उत्तम संचालक

googlenewsNext

छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी. सध्या हा शो चांगलाच चर्चेत येत असून प्रत्येक भाग प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. सध्या या घरात दररोज नवनवीन टास्क रंगत असून प्रत्येक टास्कमध्ये स्पर्धकांची एक नवीन बाजू प्रेक्षकांसमोर येत आहे. यामध्येच आता सोशल मीडियावर बिग बॉस स्पर्धक आणि अभिनेत्री गायत्री दातारची चर्चा रंगली आहे. गायत्री सध्या तिच्या एका विशिष्ट गुणवैशिष्ट्यांमुळे चर्चेत येत आहे. 

बिग बॉसच्या घरात रंगणाऱ्या प्रत्येक टास्कमध्ये खेळाडूच्या संयमाची कसोटी पाहिली जाते. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३' मधील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खेळ जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू कसोशीने प्रयत्न करत असून या सगळ्यात गायत्री दातार अव्वल ठरत आहे.  

मागील आठवड्यात कॅप्टनपदाची जबाबदारी गायत्रीवर होती. कॅप्टन आणि बिग बॅासकडून दिल्या जाणाऱ्या टास्कची संचालक अशा दुहेरी जबाबदाऱ्या तिने उत्तमरित्या निभावल्या. जसजसा बिगबॉसचा खेळ पुढे सरकत आहे, तसा गायत्रीचा उत्तम खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे.  कॅप्टनपदाची भूमिका तिने चोख निभावली याबद्दल बिग बॉसमधील बाकीच्या खेळाडूंसह सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही तिचे कौतुक केले. 

दरम्यान, याशिवाय प्रेक्षकही तिच्या खेळाचे कौतुक करत आहेत. कॅप्टन असताना तिने कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. गायत्रीच्या या उत्तम खेळामुळे तिचे चाहते तिच्यावर भलतेच खुश आहेत.
 

Web Title: bigg boss marathi fame gayatri datar A shower of appreciation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.