'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणे पडला या मुलीच्या प्रेमात, दिसायला आहे खूपच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 13:43 IST2023-06-13T13:43:00+5:302023-06-13T13:43:42+5:30
Jay Dudhane : मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये जय दुधाने सहभागी झाला होता. या शोमधून त्याला खूप लोकप्रियता मिळाली.

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणे पडला या मुलीच्या प्रेमात, दिसायला आहे खूपच सुंदर
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझन (Bigg Boss Marathi)मध्ये जय दुधाने (Jay Dudhane) सहभागी झाला होता. या शोमधून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. त्याआधी स्प्लिट्सव्हिला या रिऍलिटी शोने जयला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. या शोनंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान जय दुधानेने दोन दिवसांपूर्वीच त्याच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस एका खास अंदाजात साजरा केला. त्यावरून सेलिब्रिटींनी त्याच्या गर्लफ्रेंडलाच टॅग केलेले पाहायला मिळाले.
हर्षला पाटील ही जयची गर्लफ्रेंड असून ती व्हिडीओ क्रिएटर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १ लाख ७२ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. जयच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी शुभेच्छा देताना हर्षलाने पाठमोऱ्या असलेल्या जय सोबत काही फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. दोन दिवसांपूर्वी जयने सुद्धा हर्षला त्याची गर्लफ्रेंड असल्याचे जाहीर केले आहे. ‘माझ्या लाडक्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे म्हणत जयने हर्षला सोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. त्यावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत हर्षालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हर्षला पाटील अगोदर जय दुधाने सिमरन बावा हिला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र या बातमीत कुठलेच तथ्य नसल्याचे समोर आले होते.
जय दुधाने हा हा एथलेट प्लेअर आऊन फिटनेस लव्हर सुद्धा आहे. फिटर्नल या नावाने त्याच्या स्वतःच्या मालकीच्या जिम आहेत. ज्यात तो फिटनेसचे ट्रेनिंगही देत असतो. ठाण्यात मिस्टर इडली या नावाने त्याचे रेस्टॉरंट आहे. त्यामुळे जय सेलिब्रिटी चेहरा असण्यासोबतच एक यशस्वी व्यावसायिक आहे. लवकरच तो महेश मांजरेकर यांच्या वीर दौडले सात या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.