छोट्या पुढारीने बनवला रील, घनश्यामचा व्हिडिओ पाहून जान्हवी म्हणते- "जमत नाही तर कशाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 17:20 IST2024-12-28T17:10:21+5:302024-12-28T17:20:01+5:30

घनश्यामने काही दिवसांपूर्वी वैशाली सामंतच्या 'मस्त चाललंय आमचं' या गाण्यावर रील बनवला होता. पण, घनश्यामचा हा रील व्हिडिओ पाहून जान्हवी किल्लेकरला मात्र हसू अनावर झालं आहे.

bigg boss marathi fame janhvi killekar commented on chota pudhari ghanshyam darwade reel video | छोट्या पुढारीने बनवला रील, घनश्यामचा व्हिडिओ पाहून जान्हवी म्हणते- "जमत नाही तर कशाला..."

छोट्या पुढारीने बनवला रील, घनश्यामचा व्हिडिओ पाहून जान्हवी म्हणते- "जमत नाही तर कशाला..."

बिग बॉस मराठी ५मुळे छोटा पुढारी घनश्याम दरवडे चर्चेत आला होता. घनश्यामने त्याच्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर घनश्यामच्या चाहत्या वर्गातही भर पडली आहे. घनश्याम सोशल मीडियावर सक्रिय असून तो चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील अपडेट्स देत असतो. अनकेदा तो रील व्हिडिओही शेअर करताना दिसतो. 

घनश्यामने काही दिवसांपूर्वी वैशाली सामंतच्या मस्त चाललंय आमचं या गाण्यावर रील बनवला होता. या व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. गाडीत बसून घनश्याम या गाण्यावर हावभाव देताना व्हिडिओत दिसत आहे. पण, घनश्यामचा हा रील व्हिडिओ पाहून जान्हवी किल्लेकरला मात्र हसू अनावर झालं आहे. त्याच्या या व्हिडिओवर तिने मजेशीर कमेंट केली आहे. "आपल्याला जमत नाही मग कशाला करायची reel", असं म्हणत जान्हवीने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.


बिग बॉसच्या घरात जान्हवी आणि घनश्याममध्ये चांगली मैत्री झाली होता. तर अनेकदा त्यांचे खटके देखील उडायचे. पण, बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मात्र त्यांनी त्यांची मैत्री कायम ठेवली आहे. बिग बॉस संपल्यानंतर जान्हवी आणि घनश्याम दिवाळीनिमित्त भेटलेदेखील होते. 
 

Web Title: bigg boss marathi fame janhvi killekar commented on chota pudhari ghanshyam darwade reel video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.