'बिग बॉस मराठी' गाजवलेल्या मेघा धाडेची मालिकेत एन्ट्री, खलनायिकेची भूमिका साकारणार, पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 02:31 PM2024-09-03T14:31:29+5:302024-09-03T14:32:35+5:30

मेघा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस मराठी' गाजवलेल्या मेघाची झी मराठीच्या मालिकेत वर्णी लागली आहे. 

bigg boss marathi fame megha dhade to play negative role in zee marathi savlyani janu savali serial | 'बिग बॉस मराठी' गाजवलेल्या मेघा धाडेची मालिकेत एन्ट्री, खलनायिकेची भूमिका साकारणार, पाहा प्रोमो

'बिग बॉस मराठी' गाजवलेल्या मेघा धाडेची मालिकेत एन्ट्री, खलनायिकेची भूमिका साकारणार, पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi : सध्या बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची सर्वत्र चर्चा आहे. बिग बॉस मराठीचा पहिला सीझनही प्रचंड गाजला होता. अभिनेत्री मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली होती. मेघा बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. आता मेघा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस मराठी गाजवलेल्या मेघाची झी मराठीच्या मालिकेत वर्णी लागली आहे. 

झी मराठीवर ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मेघा धाडे दिसणार आहे. मेघा या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये एक मुलगी स्टेजवर गाताना दिसत आहे. पण, सूर मात्र मालिकेच्या नायिकेचे आहेत. ते गाणं ऐकून मालिकेचा नायक आवाजाच्या प्रेमात पडल्याचं दिसत आहे. नायकाने स्तुती केल्यानंतर नायिका त्याला थँक्यू म्हणणार तितक्याच प्रोमोमध्ये मेघाची एन्ट्री होत असल्याचं दिसत आहे. 


मेघा तिला सुनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. "तुला काय वाटतं हा टाळ्यांचा कडकडाट, ही प्रशंसा सगळी तुझ्यासाठी? तुझा आवाज माझ्या मुलीसाठी माझ्याकडे गहाण ठेवलाय, हे कायम लक्षात ठेवाचंस", असं मेघा तिला म्हणताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये मेघाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळत आहे. मेघाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

'सावळ्याची जणू सावली' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता साईंकित कामत आणि अभिनेत्री प्राप्ती रेडकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुलेखा तळवलकर, आशिष कुलकर्णी, वीणा जगताप यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: bigg boss marathi fame megha dhade to play negative role in zee marathi savlyani janu savali serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.