आम्ही डेटिंग करत नाहीये! अरबाजबरोबरच्या नात्यावर निक्कीचं स्पष्टीकरण, म्हणाली- "तो मला आवडतो पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 14:40 IST2024-10-15T14:39:50+5:302024-10-15T14:40:18+5:30
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर निक्की आणि अरबाज एकत्रही दिसले होते. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, निक्कीने या चर्चांना पूर्णविराम देत अरबाजसोबतच्या नात्यावर स्पष्टिकरण दिलं आहे.

आम्ही डेटिंग करत नाहीये! अरबाजबरोबरच्या नात्यावर निक्कीचं स्पष्टीकरण, म्हणाली- "तो मला आवडतो पण..."
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी ५ ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील निक्की आणि अरबाजची जोडी हिट ठरली होती. पहिल्या दिवसापासूनच निक्की आणि अरबाजमध्ये मैत्री झाली होती. अनेकदा त्यांच्यात खटके उडाल्याचंही पाहायला मिळालं. पण, वाद मिटवून ते बिग बॉसच्या घरात लगेच एकत्र आल्याचंही दिसलं होतं. अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निक्कीने रडून घर डोक्यावर घेतलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर निक्की आणि अरबाज एकत्रही दिसले होते. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, निक्कीने या चर्चांना पूर्णविराम देत अरबाजसोबतच्या नात्यावर स्पष्टिकरण दिलं आहे.
निक्की बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर इन्स्ंटट बॉलिवूडला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अरबाजसोबतच्या नात्याबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, "आमचं नातं हे मैत्रीपलिकडचं आहे. पण, सध्या तरी आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बाहेर येऊन आम्ही एकमेकांचं आयुष्य कसं आहे, लाइफस्टाइल कसं आहे, हे समजून घेत आहोत. आम्ही डेटिंग करत नाहीये. मी काही गोष्टी नाकारू शकत नाही. जसं की अरबाज मला आवडतो. त्याच्यावर माझं प्रेम आहे. पण, ते प्रेम मैत्रीचं आहे की आणखी वेगळं ते मला माहीत नाही. पण, अरबाज एक चांगला मुलगा आहे".
अरबाजला बिग बॉस मराठीच्या घरातून लवकर निरोप घ्यावा लागला. पण, निक्की मात्र टॉप ३ पर्यंत पोहोचली होती. तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. बिग बॉसच्या घऱातून बाहेर आल्यानंतर निक्की आणि अरबाज डिनर डेटसाठीही गेले होते. तिथे त्यांना स्पॉटही करण्यात आलं होतं. तर त्या दोघांनीही एकमेकांबरोबरचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत.