हर हर महादेव! 'छावा'च्या निमित्ताने वैभव-इरिनाने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओची होतेय चर्चा; म्हणाले-"१४ फेब्रुवारीला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:35 IST2025-02-12T12:31:45+5:302025-02-12T12:35:51+5:30
नुकताच वैभव चव्हाणने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.

हर हर महादेव! 'छावा'च्या निमित्ताने वैभव-इरिनाने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओची होतेय चर्चा; म्हणाले-"१४ फेब्रुवारीला..."
Vaibhav Chavan: 'बिग बॉस' मराठीच्या पाचवं पर्व चांगलंच गाजलं होतं. अगदी काही महिन्यांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु यामध्ये सहभागी होणारे स्पर्धक सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या शोची जितकी चर्चा होते, तितकेच हे स्पर्धक सोशल मीडियावर चर्चेत असतात. 'बिग बॉस'च्या या पर्वात निकी-अरबाजप्रमाणे बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना रुडाकोवाच्या मैत्रीबद्दल नेटकऱ्यांनी अनेक अंदाज लावले होते. दरम्यान, वैभव आणि इरिना शोबाहेर आल्यापासून एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. अशातच नुकताच वैभव चव्हाणने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.
'छावा' चित्रपटाच्या निमित्ताने वैभव-इरिनाने हा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये परदेसी गर्ल इरिनाचा भारतीय अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे. "हर हर महादेव...! जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारख आणि लढावं तर छत्रपती शंभाजी महाराजांसारखं...", असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. याशिवाय बॅकग्राउंडला छावा मधील गाणं लावलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ त्यांनी हा सुंदर व्हिडीओ शूट केला आहे. त्याबरोबर व्हिडीओच्या सुरुवातीला "१४ फेब्रुवारीला, व्हॅलेंटाईन नाहीतर 'छावा'...", असं हटके टेक्स्ट त्यांनी दिलं आहे.
वैभव चव्हाणने हा खास व्हिडीओ शेअर करताना 'छावा' सिनेमाला टॅगदेखील केलं आहे. शिवाय या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स करीत प्रेमाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, वैभव-इरिनाच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या कमेंट्स करत एका नेटकऱ्याने म्हटले, "जय भवानी..." दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले,''बारामतीचा आवाज". तर, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.