विशाल निकमने शेअर केले हळदीचे फोटो; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:54 IST2022-06-07T18:54:01+5:302022-06-07T18:54:45+5:30
Vishal nikam: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या विशालने नुकतेच काही हळदीचे फोटो शेअर केले आहेत.

विशाल निकमने शेअर केले हळदीचे फोटो; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणार शो म्हणजे बिग बॉस मराठी. काही महिन्यांपूर्वीच या शोचं तिसरं पर्व पार पडलं. आता हा शो संपून बरेच महिने उलटले आहेत. मात्र, त्यातील सहभागी स्पर्धकांची सोशल मीडियावर अजूनही चर्चा रंगते. त्यातलंच एक नाव म्हणजे विशाल निकम.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला विशाल सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. सध्या तो 'आई मायेचं कवच' या मालिकेत मानसिंग ही भूमिका साकारत आहे. त्यामुळे वरचेवर त्याची चर्चा रंगत असते. मात्र, सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या विशालने नुकतेच काही हळदीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने "हळद लागली, हळद लागली, आमच्या भावाला हळद लागली!", असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनवरुन त्याच्या भावाची हळद असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरम्यान, विशालचा भाऊ सूरज निकम याचं लग्न असल्यामुळे घरात विधीवत लग्नविधी होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशालच्या घरी हळदी समारंभ पार पडला. परंतु, सोशल मीडियावर विशाल आणि त्याने दिलेल्या कॅप्शनची चर्चा रंगत आहे. इतकंच नाही तर विशाल स्वत: कधी बोहल्यावर चढणार असा प्रश्नही फिमेल चाहत्यांनी त्याला कमेंटमध्ये विचारला आहे.