'बिग बॉस मराठी' फेम योगिता चव्हाणच्या पतीची हिंदी मालिकेत एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:57 PM2024-10-04T12:57:41+5:302024-10-04T12:58:10+5:30

'जीव माझा गुंतला' मालिकेतून अभिनेता सौरभ चौघुलेला प्रसिद्धी मिळाली. आता सौरभची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. 

Bigg Boss Marathi fame Yogita Chavan's husband actor saurabh choughule to play important role in entry in the Hindi serial safal hogi teri aaradhana | 'बिग बॉस मराठी' फेम योगिता चव्हाणच्या पतीची हिंदी मालिकेत एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका, प्रोमो समोर

'बिग बॉस मराठी' फेम योगिता चव्हाणच्या पतीची हिंदी मालिकेत एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका, प्रोमो समोर

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी ५ ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यंदाच्या सीझनमध्ये अभिनेत्री योगिता चव्हाणही सहभागी झाली होती. कलर्स मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' मालिकेतून योगिता घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. 'जीव माझा गुंतला' मालिकेतच अभिनेता सौरभ चौघुलेही प्रमुख भूमिकेत होता. या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली. आता सौरभची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. 

सौरभ चौघुलेच्या हाती मोठा हिंदी प्रोजेक्ट लागला आहे. एका हिंदी मालिकेत सौरभ महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सौरभ बंदुकीतून गोळी मारताना दिसत आहे. तर एक गरोदर महिलाही या व्हिडिओत दिसत आहे. 'सफल होगी तेरी आराधना' असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत सौरभ विलासराव हे पात्र साकारताना दिसणार आहे. १४ ऑक्टोबरपासून दंगल टीव्ही या चॅनेलवर ही मालिका प्रेक्षकांना बघता येणार आहे. 


सौरभने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. रुप नगर के चित्ते या सिनेमात तो दिसला होता. सौरभ आणि योगिताने ३ मार्चला लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. जीव माझा गुंतला या मालिकेच्या सेटवरच त्यांचे सूर जुळले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: Bigg Boss Marathi fame Yogita Chavan's husband actor saurabh choughule to play important role in entry in the Hindi serial safal hogi teri aaradhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.