'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेला अवघे काही तास बाकी, निक्की आणि जान्हवीच्या देलखेच अदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 03:46 PM2024-10-06T15:46:26+5:302024-10-06T15:47:12+5:30

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेवर लागलं आहे.

Bigg Boss Marathi Grand Finale On 6 October Nikki Tamboli Jahnavi Killekar Dance Performance | 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेला अवघे काही तास बाकी, निक्की आणि जान्हवीच्या देलखेच अदा!

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेला अवघे काही तास बाकी, निक्की आणि जान्हवीच्या देलखेच अदा!

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा  (Bigg Boss Marathi Season 5) आज ग्रँड फिनाले पार पडणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेवर लागलं आहे. अवघ्या काही तासांत  यंदाच्या सीझनचा विजेता मिळणार आहे.  यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत होता. आता या सीझनचा शेवटही धमाकेदार होणार आहे.  ग्रँड फिनालेमध्ये निक्की तांबोळी आणि जान्हवी या आपल्या डान्सने चाहत्यांना घायळ करणार आहेत. 

 कलर्स मराठीने आपल्या सोशल मीडियावर ग्रँड फिनालेचे काही प्रोमो शेअर केले आहेत. एका प्रोमोमध्ये निक्की तांबोळी ही आपला जलवा दाखवताना दिसून येत आहे. ती आपल्या अदांनी चाहत्यांवर मोहिनी घालणार आहे. 


तर यासोबतच जान्हवीचा लूकदेखील समोर आला आहे. प्रोमोमध्ये जान्हवी ही जबरदस्त दिसतेय. आपल्या दिलखेचक अदांनी ती Grand Finale च्या स्टेजवर रंगत आणणार आहे.  एवढंच काय तर निक्की आणि जान्हवीसोबत अंकिता, सुरज, अभिजीत आणि धनंजय पोवार हेदेखील चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत. 


'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहा फायनलिस्ट आहेत. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत.  प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या सदस्याला जिंकवण्यासाठी भरपूर व्होटिंग केलं आहे. सहा फायनलिस्ट सदस्यांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 

Web Title: Bigg Boss Marathi Grand Finale On 6 October Nikki Tamboli Jahnavi Killekar Dance Performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.