Video: स्नेहामुळे आलं दादूसच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 07:00 PM2021-10-31T19:00:00+5:302021-10-31T19:00:00+5:30

Bigg boss marathi: बिग बॉसची चावडी आठवड्यात चांगलीच गाजते. याच चावडीवर आज स्नेहामुळे दादूसच्या डोळ्यात पाणी येणार आहे. 

in bigg boss marathi house dadus cry because sneha write emotional post | Video: स्नेहामुळे आलं दादूसच्या डोळ्यात पाणी

Video: स्नेहामुळे आलं दादूसच्या डोळ्यात पाणी

googlenewsNext

बिग बॉस मराठी (bigg boss marathi) हा शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. कधी घरातील टास्कमुळे तर कधी घरातील स्पर्धकांमुळे. सध्या या शोमध्ये शनिवार-रविवार या दोन दिवशी बिग बॉसची चावडी भरते. ज्यात महेश मांजरेकर (mahesh manjarekar) घरातल्या सदस्यांची कानउघडणी करतात. इतकंच नाही तर घरातील सदस्यांना एकमेकांविषयी असलेले समज-गैरसमज किंवा मत मांडायलाही संधी मिळते. त्यामुळे बिग बॉसची चावडी आठवड्यात चांगलीच गाजते. याच चावडीवर आज स्नेहामुळे (sneha wagh) दादूसच्या (dadus) डोळ्यात पाणी येणार आहे. 

सध्या सोशल मीडियावर बिग बॉसच्या चावडीचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. हा प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यात दादूस स्नेहामुळे रडताना दिसत आहेत. 

Bigg Boss Marathi 3, Episodes, 31 Oct : 'मीराला बाहेर काढा'; उत्कर्षचं वाक्य त्यालाच भोवणार?
 

बिग बॉसच्या चावडीवर स्नेहा दादूसविषयी तिचं मन व्यक्त करते. यात ती दादूसला तिच्या वडिलांची जागा देते. विशेष म्हणजे वडिलांच्या निधनानंतर बिग बॉसच्या घरात दादूसने तिच्या वडिलांची कमी भरुन काढली असंही ती यावेळी म्हणते. स्नेहाने दादूस यांना दिलेला आदर, मान, प्रेम पाहून दादूसच्या डोळ्यात पाणी येतं. आणि, ते रडू लागतात.

दरम्यान, दादूसला रडताना पाहून स्नेहाच्या डोळ्यातही पाणी येतं. इतकंच नाही तर घरातील अन्य सदस्यदेखील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 
 

Web Title: in bigg boss marathi house dadus cry because sneha write emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.