"शाळेची फी भरण्यासाठी बाबांनी विकलं रक्त", जान्हवीने सांगितले आई-वडिलांनी घेतलेले कष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:00 AM2024-09-26T10:00:21+5:302024-09-26T10:01:02+5:30

जान्हवीचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला आहे.

Bigg Boss Marathi Jahnavi Killekar Talk About Her Parents Hard Work | School Fees | "शाळेची फी भरण्यासाठी बाबांनी विकलं रक्त", जान्हवीने सांगितले आई-वडिलांनी घेतलेले कष्ट!

"शाळेची फी भरण्यासाठी बाबांनी विकलं रक्त", जान्हवीने सांगितले आई-वडिलांनी घेतलेले कष्ट!

Bigg Boss Marathi Jahnavi Killekar : ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रवेश केल्यापासून अभिनेत्री जान्हवी किल्लेकर प्रचंड चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासून जान्हवी आपला गेम खेळतेय. जान्हवीचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला आहे.

नुकत्याच एका एपिसोडमध्ये जान्हवीने डीपीशी बोलताना तिच्या वडिलांचा डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग सांगितला. जान्हवी म्हणाली, "लहानपणी शाळेची फीस भरायची होती. तेव्हा पपांना अडीच ते तीन हजार रुपये पगार होता. त्यात सामान आणायला दीड हजार जायचे. घरातली खर्चासाठी बाकी पैसे खर्च व्हायचे. तर आईकडे शाळेची फीस भरायला पैसे नव्हते. तर मला माझ्या बहिणीला शाळेत फीस न भरल्यामुळे उभे राहावं लागायचं. म्हणजे ज्या मुलांनी फीस नाही भरली, ते उभे राहा किंवा वर्गाबाहेर जाऊन उभे राहा, असं होतं. पगार संपला, शाळेची फीस भरण्यासाठी पैसे नव्हते.  तेव्हा माझ्या वडिलांनी एका हाताचे रक्त विकलं होतं".


जान्हवीने सांगितलं, "तेव्हा एका रक्ताच्या बॉटलचे १५० रुपये मिळायचे. पण, माझ्या शाळेची ३५० रुपये होती. तेव्हा एकाच व्यक्तीचे परत रक्त घेत नाहीत. म्हणून चेहऱ्याला रुमाल बांधला आणि परत जाऊन दुसऱ्या हाताचे रक्त दिलं. असे करुन त्यांनी ३०० रुपये कमावले आणि आईकडचे ५० रुपये घेऊन त्यांनी माझ्या शाळेची फीस भरली. त्यानंतरही खूप वर्ष ते तसेच करत आले. जेव्हा त्याच्या हातावर ते निशाण दिसले तेव्हा आम्ही त्यांना विचारलं. तर आई रडायला लागली'. 

पुढे जान्हवी म्हणाली, "आता मला त्यांना नोकरीमधून मुक्त करायचे आहे. मी अभिनेत्री आहे. पण, अजून मी एवढं काही कमावलं नाहीये. अजूनही मी त्यांना कामातून मुक्त करु शकले नाही. आता बाहेर गेल्यावर मी त्यांना आराम करायला सांगणार, हीच माझी इच्छा आहे. लोकांना वाटतं सेलिब्रेटी आहे, श्रीमंत आहेत. पण असं काही नसतं".

Web Title: Bigg Boss Marathi Jahnavi Killekar Talk About Her Parents Hard Work | School Fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.