Bigg Boss Marathi 3, Episodes, 1 Nov: 'आविष्कारनंतर आणखी एका सदस्याचा संपणार प्रवास; लवकरच रंगणार 'हा' अवघड टास्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 14:45 IST2021-11-01T14:45:00+5:302021-11-01T14:45:00+5:30
Bigg boss marathi:आज बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क रंगणार असल्याचं दाखवण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा टास्क जितका सोपा वाटतो तितका सोपा नसल्याचं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 1 Nov: 'आविष्कारनंतर आणखी एका सदस्याचा संपणार प्रवास; लवकरच रंगणार 'हा' अवघड टास्क
गेल्या ३१ दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात आता एक एक करत नॉमिनेशन टास्क पार पडत आहेत. आजही या घरात असंच एका नॉमिनेशन कार्य रंगणार आहे. त्यामुळे या कार्यानंतर घरात कोणता स्पर्धक राहणार आणि कोणत्या स्पर्धकाचा प्रवास संपणार हे लवकरच समोर येणार आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आज बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क रंगणार असल्याचं दाखवण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा टास्क जितका सोपा वाटतो तितका सोपा नसल्याचं पाहायला मिळत आहे.
'Bigg Boss'फेम रेशम टिपणीस करतीये 'या' व्यक्तीला डेट; पाहा तिच्या बॉयफ्रेंडचे Photos
“आज बिग बॉसच्या घराला साजेस असं तोरण लागणार आहे. ज्या सदस्यांचे फोटो तोरणावर नसतील ते सदस्य नॉमिनेट होतील,” असं बिग बॉसने घरातल्या सदस्यांना सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या नॉमिनेशन टास्कनंतर कोणत्या सदस्याचा बिग बॉसचा प्रवास संपणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.