Bigg Boss Marathi 2 – घरात कोणामध्ये होतेय अदलाबदली ?,वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 15:45 IST2019-08-08T15:44:10+5:302019-08-08T15:45:13+5:30
नेहाने अभिजीत जसे नेहमी म्हणतो “अरे हीच नेहेमीच आहे, कायम असचं करते ही. त्यावर अभिजीतने नेहा कसे व्यक्त होते हे करून दाखविले आणि तू कसं करतोस रे आणि ही अॅक्टिंग सुरू झाली.

Bigg Boss Marathi 2 – घरात कोणामध्ये होतेय अदलाबदली ?,वाचा सविस्तर
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहुणे आल्यापासुन बरीच धम्माल मस्ती सुरू आहे. वेगवेगळे टास्क ते सदस्यांना देत आहेत. किशोरी शहाणे आणि अभिजीत बिचुकले यांना संजय नार्वेकर यांनी दिलेला मजेदार टास्क आज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि याचसोबत अभिजीत केळकर आणि नेहाला देखील एक टास्क देणार आहेत. ज्यामध्ये अभिजीत केळकरला नेहा आणि नेहाला अभिजीत केळकर बनून कसे एकमेकांशी भांडतात याची अॅक्टिंग करायची आहे आणि अशा प्रकारे घरामध्ये अदलाबदली होणार आहे. या दोघांनीही या टास्कमध्ये पुरेपूर धम्माल आणण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याची सुरुवात अभिजीतने नेहासारख्या चेहर्याचे हावभाव करून केली. नेहाने अभिजीत जसे नेहमी म्हणतो “अरे हीच नेहेमीच आहे, कायम असचं करते ही. त्यावर अभिजीतने नेहा कसे व्यक्त होते हे करून दाखविले आणि तू कसं करतोस रे आणि ही अॅक्टिंग सुरू झाली.
Also Read: किशोरी शहाणे बनल्या बिचुकलेच्या आई ?
घरामध्ये आलेले पाहुणे सदस्यांना आज एक मजेदार टास्क देणार आहेत. आणि या टास्कमुळे घरातील वातावरण जरा हलक होणार आहे. संजय नार्वेकर यांनी किशोरी शहाणे यांना सांगितले टास्कमध्ये तुम्ही बिचुकलेंची आई आणि ते तुमची मुलगी. हे ऐकल्यावर बिचुकले यांना आश्चर्याचा धक्का बसला. इतकेच नसून पुढे संजय नार्वेकर म्हणाले यांना दोन वेण्या घालून शाळेमध्ये पाठवायचे आहे. यावर मात्र बिचुकले म्हणालe, “संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे असे नको.” त्यावर सगळ्यांचे म्हणणे पडले मग काय झालं... किशोरी शहाणे यांनी अभिजीत बिचुकलेला वेण्या घालून दिल्या.