Bigg Boss Marathi 3: शनिवारची चावडी! महेश मांजरेकरांनी मीराला झाप झाप झापलं...; गायत्रीला ‘नंदीबैल’ म्हटलं!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 11:23 AM2021-09-26T11:23:34+5:302021-09-26T11:25:11+5:30

bigg boss marathi season 3 : असंच पाहिजे मिरी टिरीला...!  मांजरेकरांनी घेतली शाळा, चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

bigg boss marathi season 3 first weekend war with mahesh manjrekar see video | Bigg Boss Marathi 3: शनिवारची चावडी! महेश मांजरेकरांनी मीराला झाप झाप झापलं...; गायत्रीला ‘नंदीबैल’ म्हटलं!!

Bigg Boss Marathi 3: शनिवारची चावडी! महेश मांजरेकरांनी मीराला झाप झाप झापलं...; गायत्रीला ‘नंदीबैल’ म्हटलं!!

googlenewsNext
ठळक मुद्देकालच्याच चावडीवर महेश मांजरेकरांनी मीरासोबत गायत्री दातारचीही शाळा घेतली.

बिग बॉस मराठी 3’चा '(Bigg Boss Marathi 3) पहिला एपिसोड धमाकेदार ठरला. शोच्या पहिल्याच दिवशी भांडणाचा भडका उडाला आणि आताश: शो रंगात येऊ लागलायं.   अशात शोचा पहिला वीकेंड कसा रंगणार? ही उत्सुकता होतीच. तर चावडीचा कालचा एपिसोडही धम्माल रंगला. ‘बिग बॉस मराठी 3’चे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी चावडीवर काही स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. मीरा जगन्नाथला (Meera Jagganath) मांजरेकरांनी चांगलंच झापलं. इतकं की, त्यांच्यासमोर मीराची बोलती बंद झाली. केवळ मीराचं नाही तर गायत्री दातार (Gayatri Datar) हिचीही मांजरेकरांनी चांगलीच तासली. 
आधी ऐकायला शिक..., अशा शब्दांत महेश मांजरेकरांनी मीराचा क्लास घेतला. दादूस आणि अक्षय यांच्यात झालेल्या टास्कमध्ये दादूसने अक्षयने केलेली रेसिपी निमूटपणे खाल्ली, खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन घडवलं. या टास्कमध्ये विजेता कोण होणार, हे महिला सदस्यांनी एकमतानं ठरवायचं असताना अक्षयचं खरा विजेता , अशी भूमिका मीरानं घेतली.

उर्वरित महिला सदस्यांनाही तिनं आपल्या बाजूनं फिरवलं. मग काय सर्व महिलांनी अक्षयला या टास्कचा विजेता घोषीत केलं. दादूसने यावर आक्षेप घेतला आणि बिग बॉसच्या घरात नवा वाद सुरू झाला. मग मात्र मीराने अचानक पलटी मारत आणि स्वत:चं मत दादूसला दिला. झालं काय तर टास्कची वाट लागली. ऐनवेळी ना दादूसला गुण मिळाला, ना अक्षयला. महेश मांजरेकरांनी नेमक्या याच कारणाने मीराला फैलावर घेतलं. मीरा तुला काय वाटलं दादूस जिंकला नाही? मला वाटलं, मला वाटलं... काय वाटलं...? असा सवाल महेश मांजरेकरांनी केला. मीरा मध्येच बोलत असताना, ऐक आधी ऐकायला शिक़.., असं महेश मांजरेकर यांनी तिला बजावलं.

गायत्रीला म्हणाले नंदी बैल...

कालच्याच चावडीवर महेश मांजरेकरांनी मीरासोबत गायत्री दातारचीही शाळा घेतली. ‘गायत्री एका नंदी बैलासारखी झाली आहे. सतत मीराच्या मागे मागे करत असते. तुझा वैयक्तिक परफॉर्मन्स कुठेच दिसत नाही. तुझा बुगू बुगू करणारा नंदीबैल झाला आहे. मीरा काही बोलली की त्यावर तू विचार न करता बुगू बुगू करते. मला वाटलं होतं की तू घरात काही वेगळे, काही तरी सॉलिड खेळशील, पण तसं अजिबातच दिसत नाही. तू मीराला आंधळेपणाने फॉलो करत आहेस, असं ते म्हणाले.

चाहते म्हणाले...


मांजरेकरांनी मीरा जगन्नाथची बोलती बंद केली. नेटकºयांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. असंच पाहिजे मिरी टिरीला, असे एका चाहत्याने म्हटले. मांजरेकरांनी मीराला खडे बोल सुनावले हे बरं झालं. खराब जेवण बनवणाºयापेक्षा ते खाणारा अधिक सरस असतो, अशी कमेंट एका चाहत्याने केली. मीरा ही मारकुंड्या गाईसारखी झगडत असते नुसती, अशी कमेंट एका युजरने केली.
 

Web Title: bigg boss marathi season 3 first weekend war with mahesh manjrekar see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.