Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या ख्रिसमस सरप्राईजने सगळेच चकीत; एलिमनेट झालेला सदस्य पुन्हा घरात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 00:00 IST2022-12-25T23:55:16+5:302022-12-26T00:00:34+5:30
प्रत्येक आठवड्याच्या शेवटी एक किंवा जास्त सदस्यांना घराचा निरोप घ्यावा लागतो, पण यावेळी...

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या ख्रिसमस सरप्राईजने सगळेच चकीत; एलिमनेट झालेला सदस्य पुन्हा घरात!
Bigg Boss Marathi 4 Elimination: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा शेवट आता जवळ आला आहे. अवघ्या १४ दिवसांचा खेळ शिल्लक आहे आणि स्पर्धकांमधील चढाओढ आधीपेक्षा अधिकच तीव्र झाली आहे. त्यातच आज बिग बॅासने घरातील सदस्यांना ‘ख्रिसमस’ सरप्राईज देत सुखद धक्का दिला. रविवारच्या बिग बॅासच्या चावडीच्या भागात महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांना टास्क देत शाळा तर घेतलीच पण एक धमाल सरप्राइजही दिलं.
नॉमिनेशन कार्यानुसार या आठवड्यात राखी सावंत, आरोह वेलणकर आणि प्रसाद जवादे नॉमिनेटेड होते. त्यामुळे या तिघांपैकी नेमका कोणता सदस्य बाहेर पडणार, याची उत्सुकता सर्वांना होती. या आठवड्यासाठी वोटिंग लाइनच बंद ठेवण्यात आली होती, पण सदस्यांना याची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. एलिमनेशनची वेळ जवळ आली आणि मांजरेकरांनी पहिल्या सेफ सदस्याचं नाव जाहीर केलं. त्यानुसार प्रसाद जवादे सेफ झाला. पुढे राखी आणि आरोह यांच्यापैकी आरोहचा प्रवास आज संपल्याचं मांजरेकरांनी जाहीर केलं.
कहानी में ट्विस्ट!
बिग बॉसच्या प्रथेनुसार आरोह त्याच्या नावाची पाटी घेऊन घराबाहेर पडताना दिसला. पण घराबाहेर पडताच आरोहच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आणि त्याला स्टोअर रुममध्ये पाठवण्यात आलं. यानंतर मांजरेकरांनी उर्वरित सदस्यांसाठी स्टोअर रुममध्ये ख्रिसमसचं सरप्राइझ ठेवलं असल्याचं सांगितलं. पुढे सर्व सदस्य स्टोअर रुममध्ये गेले असता आरोह घराबाहेर गेलाच नसल्याचं सर्वांना कळलं आणि घरातील सदस्यांना जबरदस्त सरप्राइज मिळालं. त्यामुळे या आठवड्यात कोणताही सदस्य स्पर्धेबाहेर गेलेला नाही. अशा पद्धतीने आज एलिमनेट झालेलं भासवण्यात आलेला सदस्य पुन्हा घरातच येऊन दाखल झाला.
मांजरेकर यांनी यावेळी कुणी बाहेर गेलेलं नसलं तरी ही स्पर्धकांना मिळालेली शेवटची संधी असल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे या आठवड्यात जरी कुणी एलिमनेट झालेलं नसलं तरी पुढच्या आठवड्यात एलिमनेशन होणार हे नक्की.