Bigg Boss Marathi Season 5: अभिजीतच्या अंगात आलाय 'डर'चा शाहरुख, मिमिक्री करत दाखवलं छुपं टॅलेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 04:15 PM2024-09-17T16:15:21+5:302024-09-17T16:16:13+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: अभिजीत सावंतचा कॉमेडी व्हिडिओ पाहिलात का?

Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant does Shahrukh khan s mimicry | Bigg Boss Marathi Season 5: अभिजीतच्या अंगात आलाय 'डर'चा शाहरुख, मिमिक्री करत दाखवलं छुपं टॅलेंट

Bigg Boss Marathi Season 5: अभिजीतच्या अंगात आलाय 'डर'चा शाहरुख, मिमिक्री करत दाखवलं छुपं टॅलेंट

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात होऊन ५० दिवस झाले आहेत. घरात सदस्यांची एकूणच धमाल सुरु आहे. कधी भांडणं कधी मजामस्ती करत सदस्य बिग बॉसचं घर दणाणून सोडत आहेत. अभिजीत सावंतचा (Abhijeet Sawant) एक प्रोमो समोर आलाय. यामध्ये तो चक्क शाहरुख खानची नक्कल करतोय. समोर बसलेला सूरजही त्याच्याकडे पाहून हसतोय. हा प्रोमो तुफान व्हायरल होतोय.

अभिजीत सावंत उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहे हे बिग बॉसमुळे सर्वांसमोर आले आहे. घरात खिचडी बनवत असताना अभिजीत 'डर' मधल्या शाहरुख खानसारखं बोलताना आणि हसताना दिसतोय. अगदी हुबेहुब तो शाहरुख सारखा हसतोय. तर त्याच्यासारखाच 'ककक किरणsss' स्टाईल बोलतोय. सूरज म्हणतो, 'काय बनवताय शाहरुख खान तुम्ही? कसं वाटतंय तुम्हाला?' यावर अभिजीत शाहरुख स्टाईल म्हणतो, 'एकमद मस्त खिचडी बनवलीये. मस्त लग रही है. ये जो खिचडी है ना ये मेरे दिल के बहोत क


रीब है'. 

अभिजीतचा हा परफॉर्मन्स पाहून वर्षा ताईही नंतर येत टाळ्या वाजवतात. त्याच्या या मिमिक्रीवर चाहतेही खूश झालेत. 'वाह काय अॅक्टिंग केली अभिजीत दादा','सुपर दादा' अशा कमेंट्स केल्या आहेत. घरात असं हसतंखेळतं वातावरण पाहून नेटकरी म्हणतात,'असेच राहा रे भांडू नका'.

दरम्यान काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये या आठवड्यात निक्की तांबोळी, अरबाज पटेल , वर्षा, सूरज आणि जान्हवी हे पाच जण नॉमिनेट झाले आहेत. यांच्यातलं कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant does Shahrukh khan s mimicry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.