"ही captaincy मला भारी पडली..." अभिजीत-निक्कीचं अरबाजवरून Discussion; शिजतोय नवीन गेम प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 01:34 PM2024-08-28T13:34:09+5:302024-08-28T13:37:14+5:30

आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये अरबाजबद्दल अभिजीत-निक्की यांच्यात चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant-Nikki Tamboli Discussion on Arbaaz patel | "ही captaincy मला भारी पडली..." अभिजीत-निक्कीचं अरबाजवरून Discussion; शिजतोय नवीन गेम प्लॅन

"ही captaincy मला भारी पडली..." अभिजीत-निक्कीचं अरबाजवरून Discussion; शिजतोय नवीन गेम प्लॅन

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व (Bigg Boss Marathi 5) अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. आता जस-जसे दिवस पुढे जात आहेत, तसे सर्व सदस्यांचे खरे चेहरे समोर यायला लागले आहेत.  निक्कीने ग्रुप A सोडण्याचा निर्णय घेतला असून सध्या ती एकटीच खेळत आहे.  कायम एकमेकांना साथ देणारे अरबाज व निक्की आता वेगळे झाले असून त्यांच्या जोरदार भांडण पाहायला मिळतंय. आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये अरबाजबद्दल अभिजीत-निक्की यांच्यात चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे. 

निक्की ही ग्रुप A पासून वेगळी झालीये. तर टास्कमुळे निक्की व अभिजीत एकत्र आले आहेत. ग्रुप A हा मात्र निक्कीला टार्गेट करतोय. अरबाज व निक्की यांची मैत्री होती. तेव्हा अरबाजने कॅप्टन्सी निक्कीला दिली होती.  मात्र, आता तीच कॅप्टनसी निक्कीवर भारी पडली असल्याचं तिचं म्हणणं आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत निक्कीला म्हणतो, "तू वाईट वागली आहेस, आणि ज्याप्रकारे तू त्याला दुखावलं आहेस,याबद्दल ते बोलत आहेत. त्यांनी एक खोटी स्टोरी बनवली आहे".

 निक्की म्हणते, "मी वाईट वागलेच नाही तरीही मीच व्हिलन ठरलेय आणि तो हिरो झाला आहे. त्याला आता सगळ्यांची साथ मिळतेय. त्याला हे कळत नाही आहे की एका पुरुषाचा रागही एक महिलाच थोपवू शकते. महिलेकडे ती ताकद आहे. एक स्त्री १०० लोकांवर भारी पडू शकते. मला कॅप्टन्सी भारी पडली. मी नॉमिनेट पण झाले'. यावर अभिजीतही म्हणतो, 'खूपच जास्त भारी पडली आणि तुझ्यामुळे मला पण भारी पडली". 
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant-Nikki Tamboli Discussion on Arbaaz patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.