Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 09:27 PM2024-10-06T21:27:41+5:302024-10-06T21:28:21+5:30

Bigg Boss Marathi Season 5: 'तूच आमच्यासाठी खरा विजेता' , अभिजीतच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स

Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant s Post After Being Runner Up | Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठी सीझन पाच चा आज ग्रँड फिनाले पार पडला. ७० दिवस चाललेल्या या शोमधून सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र शेवटी विजेता एकच होणार होता. अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) आणि सूरज चव्हाण हे टॉप २ पर्यंत पोहोचले. तर यांच्यात बारामतीच्या सूरज चव्हाणने ट्रॉफी नावावर केली. सूरज ट्रॉफी जिंकला असला तरी अभिजीतने सर्वांचं मन जिंकलं आहे. रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अभिजीत सावंत बिग बॉस च्या घरातील सर्वात शांत राहणारा सदस्य होता. कितीही काहीही झालं तरी त्याने कधीच संयम सोडला नाही. सूरज चव्हाणने ट्रॉफी नावावर केली तर अभिजीत रनर अप ठरला. नुकतंच अभिजीतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. तो लिहितो, "मंडळी…शब्दात व्यक्त नाही करू शकत मला जे वाटतंय ते…इतके नॉमिनेशन, इतके वोट्स आणि इतकं प्रेम! एका कलाकाराला फक्त प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा हवा असतो आणि मागच्या ७० दिवसांत तुम्ही सगळ्यांनी तो मला भरभरून दिलात! खूप खूप धन्यवाद! हा आपल्यासाठी भावूक प्रवास होता. पण आपण सर्वच यामध्ये सोबत राहिलात. हॅशटॅग अभिची आर्मी."


अभिजीत सावंतच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'अभिजीतने सर्वांनाच संयम शिकवला', 'पात्र सदस्यासोबत नेहमी असंच होतं', 'आमच्यासाठी तूच खरा विजेता आहेस' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. बिग बॉस मराठीचा पाचवा पर्व अभिजीत सावंतमुळेही गाजला. तो घरातील सर्वात लोकप्रिय सदस्य होता.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant s Post After Being Runner Up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.