Bigg Boss Marathi Season 5: दोन दिवसात अभिजीत सावंत बदलला? आर्याचा टोला; नवीन प्रोमो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 04:54 PM2024-08-28T16:54:58+5:302024-08-28T16:56:08+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: अभिजीतने मोडला नियम? निक्कीची लागली हवा

Bigg Boss Marathi Season 5 Abhijit Sawant breaks rule changed in two days Arya take a dig at him | Bigg Boss Marathi Season 5: दोन दिवसात अभिजीत सावंत बदलला? आर्याचा टोला; नवीन प्रोमो पाहिलात का?

Bigg Boss Marathi Season 5: दोन दिवसात अभिजीत सावंत बदलला? आर्याचा टोला; नवीन प्रोमो पाहिलात का?

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठी पाचवा सीजन सुरु होऊन ३० दिवस उलटले आहेत. दरम्यान नुकत्याच आता घरात दोन दोनच्या जोड्या पडल्या आहेत. कोणी एकटं दिसलं तर मानकाप्या येणार अशी ताकीद बिग बॉसने दिली आहे. कालच्या एपिसोडमध्ये अरबाज पटेलचा राग अनावर होत त्याने बिग बॉसच्या प्रॉपर्टीची तोडफोड केली. यामुळे त्याला कॅप्टन्सी मिळू शकणार नाही अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर आता नुकतंच अभिजीत सावंताचेही (Abhieet Sawant) रंग बदलल्याचं पाहायला मिळतंय. ते का? हे नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे.

बिग बॉसमध्ये एक आठवडा सदस्य जोड्यांमध्येच दिसणार आहेत. दरम्यान घरात ज्यांच्या मैत्रीमुळे सर्वांची जळत आहे त्यांची म्हणजेच अभिजीत आणि निक्की (Nikki Tamboli) यांची जोडी बनली आहे. अभिजीत बी टीमचा असूनही त्याचं निक्कीसोबत चांगलंच जमतंय. आता तर त्याला निक्कीची हवा लागल्याचंच पाहायला मिळतंय. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये जोडी सांगूनही अभिजीत एकटाच फिरताना दिसतोय. यामुळे सूरज आणि घन:श्याम त्याला नियमाची आठवण करुन देतात. तेव्हा अभिजीत म्हणतो, 'बिग बॉस मला सांगतील.' यानंतर आर्या (Aarya Jadhav) येऊन अभिजीतला तोंडावर म्हणते, 'तू तुझेच शब्द बोलतोय की निक्कीचे शब्द बोलतोय. दोन दिवसात अभिजीत सावंत पूर्णपणे बदलला?'. तर दुसरीकडे निक्की अभिजीतला म्हणते, 'चार दिवसात मी तुला ओळखलं आणि ते नाही ओळखू शकले?'


या नवीन प्रोमोनंतर आता बिग बॉसमध्ये या आठवड्यात आणखी रंगत पाहायला मिळणार हे नक्की आहे. या आठवड्यात अंकिता, वर्षा, निक्की आणि अभिजीत हे चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तसंच या आठवड्यात मोठा ट्विस्टही असणार आहे. 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Abhijit Sawant breaks rule changed in two days Arya take a dig at him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.