भावनांच्या या खेळात सगळे सदस्य झाले भावशून्य, 'बिग बॉस' काय घेणार अ‍ॅक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 10:27 AM2024-08-13T10:27:49+5:302024-08-13T10:28:32+5:30

Bigg Boss Marathi Season 5 :'बिग बॉस मराठी'च्या अलिकडच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांची एन्ट्री झाली. या चिमुकल्या पाहुण्यांनी सदस्यांना निरागस सुखासह टास्कचे दु:खदेखील दिले आहे.

Bigg Boss Marathi Season 5 ; All the members became emotionless in this game of emotions, what action will 'Bigg Boss' take? | भावनांच्या या खेळात सगळे सदस्य झाले भावशून्य, 'बिग बॉस' काय घेणार अ‍ॅक्शन?

भावनांच्या या खेळात सगळे सदस्य झाले भावशून्य, 'बिग बॉस' काय घेणार अ‍ॅक्शन?

   Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या सुरू आहे. 'बिग बॉस' म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट या सर्व गोष्टी आल्याच. 'बिग बॉस मराठी'च्या अलिकडच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांची एन्ट्री झाली. या चिमुकल्या पाहुण्यांनी सदस्यांना निरागस सुखासह टास्कचे दु:खदेखील दिले आहे. घरातील काही सदस्य बाळाची सर्वोत्तम काळजी घेताना दिसून आले. पण आजच्या भागात भावनांच्या या खेळात सदस्य भावशून्य झालेले दिसून येणार आहेत. त्यामुळे आता 'बिग बॉस' काय पाऊल उचलणार हे पाहावे लागेल.

चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होताच 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य त्यांच्यासोबत जोडले गेले. सदस्य या पाहुण्यांसोबत वेळ घालवताना दिसून आले. तर काहींनी या पाहुण्यांवरुन भांडणेदेखील केली. पण पाहुण्यांनी मात्र घरातल्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवला.


'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"हा खेळ मानवी भावनांचा आहे. दोन्ही टीम भावनाशून्य होऊन खेळलात. त्यामुळे मीदेखील आता भावनाशून्य होऊन...". घरातील सदस्य भावनाशून्य खेळल्याने बिग बॉस सदस्यांना काय शिक्षा देणार हे पाहावे लागेल.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 ; All the members became emotionless in this game of emotions, what action will 'Bigg Boss' take?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.