अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडची पुन्हा एक पोस्ट, आता तर थेट बॉलिवूड अभिनेत्यासोबतचा फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 09:43 AM2024-09-03T09:43:20+5:302024-09-03T09:44:15+5:30

अरबाजने नक्कीशी साधलेली जवळीक पाहून त्याची गर्लफ्रेंड लीझा बिंद्रा ही नाराज असल्याचं दिसत आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 Arbaaz Patel girlfriend Leeja Bindra shared a picture with Tiger Shroff | अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडची पुन्हा एक पोस्ट, आता तर थेट बॉलिवूड अभिनेत्यासोबतचा फोटो केला शेअर

अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडची पुन्हा एक पोस्ट, आता तर थेट बॉलिवूड अभिनेत्यासोबतचा फोटो केला शेअर

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात पहिल्या दिवसापासून अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांच्यात प्रेमाचे वारे वाहताना पाहायला मिळाले होते. पण, त्यानंतर दोघांच्या नात्यातही दुरावा आल्याचं पाहायला मिळालं. आदळआपट-रडारडीनंतर पुन्हा दोघांमध्ये पॅचअपही झाल्याचे दिसून आले. आता,  अरबाजच्या कथित गर्लफ्रेंडची एक पोस्ट व्हायरल होत आहे. 

निक्कीशी जवळीक साधत 'बिग बॉस'च्या घरात आरबाजचा गेम प्लॅन चांगला जबरदस्त सुरू आहे.  'बिग बॉस'च्या घराबाहेर असलेली त्याची नाती मात्र तुटताना पाहायला मिळत आहेत.  'दुर्गा' मालिकेतील कलाकार 'बिग बॉस'च्या घरात आले. तेव्हा एका प्रश्नाचं उत्तर देताना अरबाजने आपण कमिटेड असल्याचा खुलासा केला होता. बिग बॉसमध्ये जाण्याआधी त्याने एक मुलाखत दिली होती, त्यात गर्लफ्रेंडचं नाव सांगितलं होतं आणि लवकरच तिच्याशी लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. अरबाजने नक्कीशी साधलेली जवळीक पाहून त्याची गर्लफ्रेंड लीझा बिंद्रा (Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra) ही नाराज असल्याचं दिसत आहे. 


नुकतंच लीझा बिंद्रा (Leeza Bindra) हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर अरबाजचा उल्लेख करत एक पोस्ट केली होती. तिने स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला होता, त्यावर तिने लिहलं होतं की, 'प्लीज मला अरबाजसंबंधित मेसेज किंवा कमेंट करू नका'. आता यानंतर तिने पुन्हा एक पोस्ट केली आहे. तिने बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबतचा फोटो शेअर केला. पण, या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांच लक्ष वेधलं आहे. तिने लिहलं, 'ourtesy is as much a mark of a gentleman as courage' अर्थात "दैनंदिन वागण्यातील सभ्यता ही सज्जन माणसासाठी शौर्याइतकीच महत्त्वाची आहे". या कॅप्शनमधून तिने अरबजाला सुनावलं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. 


 लीझा आणि अरबाज पटेल बऱ्याच काळपासून सोबत आहेत. एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. अरबाजची गर्लफ्रेंड लीझा ही मॉडेल, कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर आहे. ती दुबईत राहते. आता अरबाज हा आधीच एका रिलेशनशिपमध्ये असताना आता तो निक्कीसोबत असा का वागत आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना प्रेक्षकांना पडला आहे. तो नक्की कोणाला फसवतोय याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Arbaaz Patel girlfriend Leeja Bindra shared a picture with Tiger Shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.