"तो चुकीचा माणूस" अरबाजच्या गर्लफ्रेंडची पोलीस तक्रार करण्याबद्दल पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 11:41 AM2024-09-24T11:41:02+5:302024-09-24T11:44:32+5:30
Bigg Boss Marathi : ' बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची जोरदार चर्चा चालू आहे. हे पर्व सध्या खूप गाजत ...
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची जोरदार चर्चा चालू आहे. हे पर्व सध्या खूप गाजत आहे. 'बिग बॉस'च्या घरात अरबाज-निक्कीची जोडी नेहमी चर्चेत होती. कधी त्यांच्या नात्यावरून तर कधी त्याच्या खेळामुळे चर्चेत असायचे. अरबाजने घरी असतानाच तो रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तो लीझा बिंद्राबरोबर (Lleeza Bindra) कमिटेड असल्याचे बोलला होता. अरबाज 'बिग बॉस'च्या घरात असताना लीझाने अनेक पोस्ट सोशल मीडियावर केल्या होत्या. तर निक्कीने अरबाज सोबतची मैत्री कायम ठेवायला आवडेल असेही त्याने सांगितले होते. आता 'बिग बॉस'च्या घराबाहेर आल्यावर अरबाज आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगचाल चर्चेत आला आहे.
'बिग बॉस'च्या घराबाहेर आल्यावर अरबाजने अनेक मुलाखतींमध्ये निक्कीसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. निक्कीसोबत मला कायम मैत्री ठेवायला आवडेल असे तो म्हणाला. शिवाय, अरबाजने निक्की जिंकावी अशी इच्छाही व्यक्त केली. तर दुसरीकडे लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत लिझाबद्दल अरबाज म्हणाला, "माझ्या वडिलांनी मला सांगितलं ज्या गोष्टी पर्सनल आहे, त्या तशाच ठेव त्या बाहेर काढू नको. मी त्यांच्या मताचा आदर करतो. म्हणून माझ्या वैयक्तिक गोष्टी मी इथे सांगू शकत नाही. तसेच मी आत असताना इथे बाहेर काय झाले याबद्दल मला माहित नाही. लिझाने सोशल मीडियावर काय पोस्ट केल्या आहेत, हे मला माहित नाही. तुम्ही मला गेम बद्दल विचारा मी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत सगळं काही सांगेन. पण माझ्या पाठीमागे काय झालं याबद्दल मी काय सांगू".
'बिग बॉस'मध्ये निक्की-अरबाज जवळ आल्यावर लीझा नाराजी दाखवणाऱ्या पोस्ट शेअर करत होती. त्यानंतर एकदा तिने पोस्ट करून अरबाजबद्दल कमेंट किंवा मेसेज करू नका असं म्हटलं होतं. त्यानंतर तिने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण अवघ्या चार दिवसांत ती सोशल मीडियावर परतली असून आता तिने अरबाज पटेलवर प्रेम असल्याची कबुली दिली. अशातच आता अरबाजची गर्लफ्रेंड लिझाने सोशल मीडियावर पुन्हा एक पोस्ट केली आहे, जिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
लिझाने थेट पोलीस तक्रारीसंदर्भात पोस्ट केली आहे. तिने लिहलं, तुम्हाला पोलीस तक्रारीचा अर्थ समजतो का? तुम्ही सगळे मला त्याच्याविरोधात पोलीस तक्रार करायला सांगत आहात, का करू? कशासाठी करू? नाही मला नाही करायची पोलीस तक्रार. मी तुम्हाला पुन्हा-पुन्हा हेच सांगतेय की तो चुकीचा माणूस नाही. कृपया तुम्ही त्याला थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा". आता एकिकडे अरबाजबद्दल लिझाने प्रेमळ भुमिका घेतली आहे. तर दुसरीकडे अरबाज हा निक्कीशी मैत्री कायम ठेवण्याबद्दल बोलला आहे. आता यांचे नाते काय वळण घेईल, हे पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता आहे.