Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया

By ऋचा वझे | Published: September 24, 2024 11:31 AM2024-09-24T11:31:08+5:302024-09-24T11:31:44+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: अरबाज म्हणतो, "मला बाहेर काढलं कारण..."

Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel reaction on show coming to end in just 70 days | Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया

Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन ७० दिवसातच निरोप घेत आहे. १०० दिवसांचा खेळ ३० दिवस आधीच संपतोय. ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठी ५ चा फिनाले होणार आहे. नुकताच अरबाज पटेल (Arbaz Patel) शोमधून एलिमिनेट झाला. तो बाहेर येताच बिग बॉसने ही घोषणा केली. यावर अरबाजची काय प्रतिक्रिया होती वाचा. 

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अरबाज पटेल म्हणाला, "मी बाहेर आलो तेव्हा मला कळलं की शो लवकर संपणार आहे. मी इतकं चांगलं खेळून पण बाहेर आलो यावरुनच मला वाटलं होतं की नक्कीच काहीतरी होणार आहे. काही कारणांमुळे मला बाहेर काढलं असणार. आता १४ दिवसातच शो संपणार आहे. मी बाहेर आल्यावर बरेच जण म्हणाले की आता टीआरपी मिळणार नाही, आम्ही शो बघणार नाही. मला असंच वाटत होतं की शो १०० दिवसांचा असता तर माझ्या जाण्यामुळे टीआरपी कमी झाला असता. आता लवकर संपतोय तर याच रँकिंकवर शो संपेल."



 
६ ऑक्टोबरला मराठी बिग बॉसचा फिनाले आणि हिंदीचा प्रीमिअर एकाच दिवशी असल्याने मराठीच्या टीआरपीवर परिणाम होईल का? यावर अरबाज म्हणाला, " मला वाटत नाही की मराठी फिनालेच्या टीआरपीवर परिणाम होईल. कारण प्रेक्षक ७० दिवसांपासून जोडले गेले आहेत. कोण ट्रॉफी घेईल हे त्यांनाही पाहायचं आहे. तसंच फायनलला मी आणि निक्की भेटणार हे बघण्याचीही प्रेक्षकांना उत्सुकता असणार आहे."

बिग बॉस मराठी सीझन ५ चा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. आता घरात  निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, पंंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे ८ स्पर्धक राहिले आहेत. या आठवड्यात बिग बॉसने या आठही स्पर्धकांना नॉमिनेट केलं आहे. 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel reaction on show coming to end in just 70 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.