Bigg Boss Marathi Season 5: अरबाजच्या गर्लफ्रेंडला पाहिलंय का?, निक्कीपेक्षाही दिसते भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 05:40 PM2024-08-14T17:40:01+5:302024-08-14T17:40:45+5:30
Bigg Boss Marathi Season 5: अरबाज बिग बॉसच्या घरात निक्कीच्या मागे लागल्याने तो नक्की कोणाला फसवतोय याची चर्चा रंगली आहे.
बिग बॉस मराठी 5 (Bigg Boss Marathi 5) मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी एक आहे अरबाज पटेल (Arbaz Patel). अरबाज हा छत्रपती संभाजीनगरचा आहे. 'स्प्लिस्ट्सव्हिला' या रिएलिटी शोमधून तो लोकप्रिय झाला. याआधी तो टिकटॉक स्टार आणि सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर होता. सध्या बिग बॉसमध्ये अरबाज निक्की तांबोळीसोबत फ्लर्ट करताना दिसतो. निक्की अआणि अरबाजचं नाव अनेकदा जोडलं जातं. अगदी बिग बॉसनेही त्यांचं नाव जोडलं होतं. मात्र अरबाजची खऱ्या आयुष्यात घराबाहेर एक गर्लफ्रेंड आहे हे तुम्हाला माहितीये का?
'स्पिट्सव्हिला' शोनंतर अरबाजने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. तो लीसा बिंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अरबाजने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली होती. त्यात तो म्हणाला होता की, "सध्या मी लीसासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आम्ही एकत्र व्हिडिओ बनवतो. मला वाटतं आमची जोडी खूप छान दिसते. तसंच आमची उंची आणि साईजही एकमेकांना अनुकूल दिसते. आम्हाला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. अनेक गोष्टी करायच्या आहेत. लोकांना वाटतं की आमचं लग्न झालंय. पण तसं नाहीए. असं असतं तर माझ्या सोशल मीडियावर मी लग्नाचे फोटो नक्की पोस्ट केले असते."
तो पुढे म्हणाला, "लोकांचं प्रेम आणि पाठिंबा असाच मिळत राहिला तर एक दिवस नक्कीच आमचं लग्नही होईल. सध्या आमची एंगेजमेंटही झालेली नाही. आम्ही फक्त रिलेशनशिपमध्ये आहोत. लवकरच लग्न करु. सध्या आम्ही कंटेंटवर लक्ष देतोय. मी काय पोस्ट करतो हे लोकांना बघायला आवडतं. मग ते चांगलं असो किंवा वाईट, मी त्यातून कमावतो."
अरबाजची गर्लफ्रेंड लीसा ही मॉडेल, कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर आहे. ती दुबईत राहते. सोशल मीडियावर तिने अरबाजवरचं प्रेम व्यक्त केलं आहे. दुसरीकडे आता अरबाज बिग बॉसच्या घरात निक्कीच्या मागे लागल्याने तो नक्की कोणाला फसवतोय याची चर्चा रंगली आहे.