"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
By तेजल गावडे | Published: October 3, 2024 07:04 PM2024-10-03T19:04:32+5:302024-10-03T19:06:21+5:30
पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी (Pandharinath Kamble Aka Paddy) नुकतेच घराबाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी सूरज चव्हाणचे पालकत्व आयुष्यभरासाठी घेतल्याचे जाहीर केले. दरम्यान आता लोकमत फिल्मीच्या लाइव्ह कार्यक्रमात छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडे(Ghanshyam Darode)नेदेखील सूरज चव्हाणच्या बाबतीत मोठा शब्द दिला आहे.
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) पहिल्या दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला. आता हा शो शेवटच्या टप्प्यात आला आहे. १०० दिवस चालणारा हा शो यंदा ७० दिवसांचा करण्यात आला आहे. यामागचं नेमकं कारण कळू शकलेले नाही. मात्र यंदाच्या सीझनमधील सर्वच स्पर्धक चांगलेच चर्चेत आले. यातील सूरज चव्हाण(Suraj Chavan)ला महाराष्ट्रातून चांगलाच पाठिंबा आणि प्रेम मिळताना दिसत आहे. इतकेच नाही तर घरातील त्याच्या सहस्पर्धकांनी देखील त्याला सांभाळून घेतले आणि मार्गदर्शन केले. नुकतेच पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी (Pandharinath Kamble Aka Paddy) घराबाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी सूरज चव्हाणचे पालकत्व आयुष्यभरासाठी घेतल्याचे जाहीर केले. दरम्यान आता लोकमत फिल्मीच्या लाइव्ह कार्यक्रमात छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडे(Ghanshyam Darode)नेदेखील सूरज चव्हाणच्या बाबतीत मोठा शब्द दिला आहे.
छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडे म्हणाला की,''मी एक पुढारी आहे. मी सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात करणारा माणूस आहे. कारण मला घोषणा करायला आवडत नाही. जे करायचे नाही त्याच्या घोषणा करून मला फसवणूक करायला अजिबात आवडत नाही. सूरज बाहेर आल्यानंतर मी जे काही करणार आहे ते सर्व जनता बघेल आणि सोशल मीडियाही बघेल.''
पुढे घनश्यामला विचारण्यात आले की, ''पॅडी दादांनी सूरजचे पालकत्व स्वीकारल्याचे जाहीर केले. तर तुम्हाला असे वाटते का ते फक्त बोलत आहेत. त्यावर छोटा पुढारीने सांगितले की, असे नाही. पॅडी दादांना वाटलं घोषित करावं त्यांनी ते केले. त्यावर माझं काहीच म्हणणं नाही. ते मदत करतील हे मला चांगलं माहित आहे. पॅडी दादा मदत केल्याशिवाय राहणार नाहीत. पॅडी दादांनी एक भाऊ, बाप म्हणून त्याचं ओझं उचललं आहे.तसेच मी त्याचा लहान भाऊ म्हणून खारीचा वाटा उचलणार आहे, हा माझा शब्द आहे.'' त्यामुळे बिग बॉस मराठी शो संपल्यानंतर सूरज चव्हाणच्या मदतीसाठी छोटा पुढारी पुढे सरसावेल का हे पाहणे कमालीचे ठरेल.