"भाऊजी भाऊजी मिठाचा खोका...", सूरजला पाहून पॅडी दादांनी केली कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:19 PM2024-08-27T16:19:59+5:302024-08-27T16:26:22+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात फक्त टास्क, भांडणे न होता. याशिवाय बऱ्याच चांगल्या मज्जामस्तीने भरलेल्या गोष्टी देखील होतात.

Bigg Boss Marathi Season 5 : "Bhauji bhauji box of salt...", Paddy Dada recited a poem after seeing Suraj | "भाऊजी भाऊजी मिठाचा खोका...", सूरजला पाहून पॅडी दादांनी केली कविता

"भाऊजी भाऊजी मिठाचा खोका...", सूरजला पाहून पॅडी दादांनी केली कविता

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंत चार जण घराबाहेर पडले आहेत. बिग बॉसच्या घरात फक्त टास्क, भांडणे न होता. याशिवाय बऱ्याच चांगल्या मज्जामस्तीने भरलेल्या गोष्टी देखील होतात. टास्क खेळणे हा गेम तर आहेच. परंतु याशिवाय एकमेकांना प्रेमाने आपुलकीने बोलणे हे देखील बिग बॉसच्या घरात होते.

नुकत्याच आलेल्या बिग बॉसच्या नव्या प्रोमोत पाहायला मिळतंय की, सूरज अंकिताला पाहून वर्षा ताईंना म्हणतो की, आई या वाहिनीला सांग जरा.. त्यावर अंकिता म्हणते की," ओ भाऊजी ड्युटी सांभाळा तुमची. लावले की नाही सासू बाईंना कामाला." त्यावर वर्षां ताई म्हणाल्या," आता मी लावणार आहे सून बाईंना कामाला. त्यावर अंकिता म्हणते की, "मी काम करणारच नाही माझी मर्जी, माझे काम."
यावर सूरज म्हणतो की, सासूचे ऐकावे लागते. त्याचा तो हक्क आहे. यावर वर्षा ताई म्हणतात की,"मला कोणी काम कर असे सांगायला लागत नाही. मी माझी काम प्रेमाने करते." या सगळ्या मस्करीवर पॅडी दादा म्हणतात,"भाऊजी भाऊजी मिठाचा खोका,  भाऊजींच्या मिशिवर बसला बोका."


अरबाजला होतोय निक्कीच्या वागण्याचा त्रास 
अरबाजने त्याची कॅप्टनसी निक्कीला दिल्यापासून  निक्की खूप बदलली आहे असे, अरबाज आणि टीम 'A 'मधल्या बाकी सदस्याचे देखील मत आहे. या विषयावरूनच अरबाज, वैभव DP दादांशी बोलताना दिसत आहे. अरबाज DP दादांना म्हणत आहे की," मला कंट्रोल नाही होत आता. मी कॅप्टनसी रूम सोडून बाहेर जात होतो झोपायला. बाथरूम साफ करत होतो, झाडू मारत होतो. ती मला म्हणते की, माझ्या कॅप्टनसीच्या रूममध्ये येऊ नकोस. माझ्या कॅप्टनसीवर अडथळा निर्माण होऊ शकतो. मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा त्रास नाही होत पण, जे माझ्या समोर घडत आहे ना त्याचा होत आहे आणि ती ते मुद्दामून करत आहे."  यावर DP दादा म्हणतात की," तू सोड यावर लक्ष देऊ नको."


 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 : "Bhauji bhauji box of salt...", Paddy Dada recited a poem after seeing Suraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.