'BIGG BOSS मराठी'च्या घरातला आग लावणारा सदस्य कोण? छोटा पुढारी म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 13:40 IST2024-08-25T13:31:53+5:302024-08-25T13:40:54+5:30
'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली. त्यामुळे आजचा भाऊचा धक्का प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारा आहे.

'BIGG BOSS मराठी'च्या घरातला आग लावणारा सदस्य कोण? छोटा पुढारी म्हणाला...
Bigg Boss Marathi Season 5 : 'BIGG BOSS मराठी'च्या नवीन सीझनची घोषणा झाली अन् चर्चेला उधाण आलं. कारण शोचा होस्ट बदण्यात आला होता. महेश मांजरेकरांची जागा रितेश देशमुखनं घेतली. प्रत्येक विकेंडला महेश मांजरेकर त्यांच्या चावडीवर स्पर्धकांची शाळा घ्यायचे. याची जागा आता भाऊच्या धक्क्याने घेतली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली. त्यामुळे आजचा भाऊचा धक्का प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारा आहे.
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या विशेष भागात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेला विचारल की ,"माचिसचं काम काय?". उत्तर देत छोटा पुढारी म्हणतो, "काडी लावणं". त्यावर रितेश भाऊ छोटा पुढारीला विचारतो, "बिग बॉस मराठी'च्या घरातला कोणता सदस्य आहे जो घरात आग लावायचं काम करतो?". यावर रितेशला उत्तर देत छोटा पुढारी म्हणतो, "माझ्या मते, हे माचिस मी डीपी दादाला देऊ इच्छितो. कारण निक्की आणि माझं जे भांडण झालं, ते डीपी दादांमुळे झालं होतं".
बिग बॉस मराठीच्या घरात आता हळूहळू सदस्यांमधील समीकरणं बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा आणि आर्या जाधव हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात कोणाचा प्रवास संपतो, हे आज रविवारी कळेल. याशिवाय, लवकरच बिग बॉसचा पाचवा आठवडा सुरु होणार आहे. त्याआधी बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री होणार असल्याचं सांगितलं जात आहे.