'बिग बॉस'मधील 'छोटे पुढारी' घनश्याम दरोडेचं वय आणि शिक्षण माहितेय का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:50 AM2024-08-29T10:50:08+5:302024-08-29T10:52:35+5:30
'बिग बॉस'च्या घरात पोहचलेला 'छोटा पुढारी' अर्थात घनश्याम दरोडे याचीदेखील सगळीकडे चर्चा पाहायला मिळतेय. छोट्या पुढारीचा गेम लोकांना आवडतोय.
Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. घरातील समीकरण पूर्णपणे बदलल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस'च्या घरात पोहचलेला 'छोटा पुढारी' अर्थात घनश्याम दरोडे( chota pudhari Ghanshyam Darode) याचीदेखील सगळीकडे चर्चा पाहायला मिळतेय. छोट्या पुढारीचा गेम लोकांना आवडतोय. तो सर्वाधिक चर्चेत असलेला 'बिग बॉस'च्या घरातील सदस्य आहे. आज आपण त्याचं वय आणि शिक्षण जाणून घेऊयात.
आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेला घनश्याम दरोडे सोशल मीडियावर चर्चेत असतो. श्रीगोंद्याचा घनश्याम दत्तात्रेय दरोडे (टाकळी लोणार) हा बहिणीनंतर आई-वडिलांना एकुलता एक मुलगा. शेतकरी कुटुंबात तो वाढला. विशेष म्हणजे छोट्या पुढारीचे शिक्षण हे पदवीपर्यंत झाले आहे. म्हणजेच काय तर छोटा पुढारी हा पदवीधर आहे.
घनश्यामला वाचनाची आवड आहे. स्थानिक ते जागतिक घडामोडींवर त्याचे लक्ष असते. छोटा पुढारी दिसण्यास जरी लहान मुलांसारखा दिसत असला तरीही तो 22 वर्षांचा आहे. तर त्यांची उंची ही 3 फूट 7 (112 सेमी) इंच आहे. 'मूर्ती लहान पण कीर्ति महान' हे वाक्य त्याला तंतोतंत लागू होतं.
छोट्या पुढारीची सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. बिग बॉसच्या घराबाहेर आतापर्यंत तो वीज, पाणी, शेती, सहकार, बाजारभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळावर उपाय आदी अनेक प्रश्नांवर बेधडक बोलताना पाहायला मिळाला आहे. आता 'बिग बॉस'च्या घरात आता येणाऱ्या आठवड्यांमध्ये तो काय धमाका करणार हे पाहण्यासारखं असणार आहे.